अहिल्यानगर/ शेवगाव/ जामखेड |प्रतिनिधी| Ahilyanagar| Jamkhed
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर एमआयडीसी, शेवगाव व जामखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत 38 लाख 20 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत 43 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी कारवाईसाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. पथकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अभिषेक खाडे (वय 25, रा. लोहगाव, ता. नेवासा), यास ताब्यात घेवून त्याच्याकडून बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने, रोख रक्कम असा 23 हजार 27 रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणारा देविदास मुसळे (वय 51, रा. ढोरजळगाव) याच्या विरूध्द कारवाई करून त्याच्या ताब्यातून 49 हजार 795 रूपये किमंतीची देशी विदेशी दारु जप्त केली.
तसेच विनापरवाना दारु विक्री करणारी महिला उषा मुसळे (रा. ढोरजळगाव) हिच्या ताब्यातून 14 हजार 160 रुपये किमंतीची देशी-विदेशी दारु जप्त केली असून या दोघांविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर खर्डा पोलीस ठाणे हद्दीत लक्ष्मण गायकवाड व इतर साथीदार हे जातेगाव शिवारातील निपाणी फाट्याजवळ पत्त्यावर पैसे लावुन तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी धाड टाकली असता 5 डावांमध्ये काही इसम गोलाकार बसुन पत्त्यावर पैसे लावू तिरट नावाचा जुगार खेळतांना सापडले.
यात बाळासाहेब खाडे (वय 50 रा. दिघोळ ता. जामखेड), बाळासाहेब नेटके (वय 63, रा. जामखेड), संतोष साळुंके (वय 45, रा. खर्डा), राजेंद्र आहेर (वय 39 रा. डोकेवाडी ता. भुम, धाराशिव), रामचंद्र राळेभात (वय 70, रा. जामखेड), दादासाहेब गायकवाड (वय 60, रा. जातेगाव) अजय सकट (वय 38, रा. खर्डा), रवींद्र भुते (वय 36, रा. खर्डा), पवन थोरात (वय 37, रा. इट ता. भुम), दत्तात्रय घाटे (वय 43, रा. नागेवाडी ता. भुम), नितीन गिते (वय 38, रा. दिघोळ), मारूती गिते (वय 48, रा. दिघोळ ता. जामखेड), बापु चव्हाण (वय 40 रा. पकरूड ता. भुम) सुनील काळे (वय 34 रा. पारगांव घुमरा ता. पाटोदा), विक्रम शिंदे (वय 50, रा. दिघोळ), दादासाहेब गायकवाड वय 44 रा. जातेगाव), मधुकर बांगर (वय 60, रा. बाहेळा ता. पाटोदा), गणेश दौंड (वय 39 रा. दौंडाचीवाडी ता. जामखेड), पंडित दाताळ (वय 36 रा. वाकी), चंद्रकांत गावडे (वय 50, रा. पारगांव ता. वाशी, धाराशीव), अहमद नुरखा पठाण (वय 43 रा. बोरखेड, जि. बीड), पोपट राजगुरू (वय 37 रा. दिघोळ), संतोष राऊत (वय 52 रा. पाटोदा), संजय भोसले (वय 23 रा.अमळनेर ता. पाटोदा), भगवान गरड (वय 34 रा. कोष्टीगल्ली भुम), गणेश शिंदे (वय 48 रा. वैद्यकीणी ता. पाटोदा), दत्तात्रय खंडागळे (वय 40 रा. मात्रेवाडी ता. भुम), धनजंय मोटे (वय 40 रा. गिरवली ता. भुम), बाजीराव जाधव (वय 52 रा. पाटोदा), अशोक भोरे (वय 35 रा. पारगाव), शंकर आवारे (वय 40 रा. माळेवाडी ता. जामखेड), धोंडीबा येळे (वय 45, रा. मोहरी), फैय्याज सय्यद (वय 49 रा. पाटोदा), लक्ष्मण गायकवाड (वय 45, रा. जातेगाव), पोपट खरतोडे (वय 60 रा. बोडकेवाडी), सुनील बोबडे (वय 45, रा. इट. ता.भुम), रावसाहेब राजगुरू (वय 35, दिघोळ ता. जामखेड), किरण गोलेकर (वय 42, रा. खर्डा), अकलाक शेख (वय 31 रा. बार्शी नाका), अशोक गिते (रा. दिघोळ ता. जामखेड) असे असल्याचे सांगितले. या सर्वांच्या ताब्यातील रोख रक्कम, तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणार साहित्य असे 37 लाख 33 हजार 600 रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांचेविरूध्द खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




