Friday, April 25, 2025
Homeनगरकोठला परिसरातील जुगाराचा डाव मोडला

कोठला परिसरातील जुगाराचा डाव मोडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोठला परिसरातील बापू शहा दर्गाच्या पाठीमागे गॅरेजच्या आडोशाला सुरू असलेल्या तिरट जुगारावर तोफखाना पोलिसांनी शनिवारी (दि. 12) छापा टाकला. तेथे तिरट जुगार खेळणार्‍या 10 जणांना पकडले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 63 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

कल्पेश सुरेश जोशी वय (रा. डाळमंडई), प्रशांत बापू काळे, संदीप विलास पालवे (दोघे रा. मंगलगेट) मुस्ताक इकबाल सय्यद (रा. कोठला), राकेश श्रीनिवास पासकंटी (रा. टांगे गल्ली), दादा रामदास गायकवाड (रा. सारसनगर) सचिन सर्जेराव चव्हाण (रा. मंगलगेट), गफार रज्जाक शेख (रा. मोची गल्ली, तोफखाना), जावेद शेख उस्मान (रा. रामवाडी), शेख अन्वरभाई गफुर (रा. झेडीगेट) अशी पकडलेल्या तिरट जुगार्‍यांची नावे आहेत.

दरम्यान, तोफखाना पोलिसांनी हद्दीतील मटका टपर्‍यांवरही छापे टाकले. डाळमंडई येथे कांतिलाल घेवरचंद शिंगवी यांच्या मटका टपरीवर सुनील गोंविद शिगटे (रा. वंजारगल्ली) याला पकडले. मंगलगेट येथे अजयसिंग पोपटसिंग राजपुत (रा. वंजारगल्ली) हा मटका घेताना मिळून आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अविनाश वाघचौरे, अहमद इनामदार, वसिम पठाण, सुरज वाबळे, संदीप धामणे, सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, सचिन जगताप, दत्तात्रय कोतकर, गौतम सातपुते, सतीश भवर, संदीप गिर्‍हे यांच्या पथकाने केली.

हातभट्ट्यांवर धाडी

16 तोडी कारंजा येथे हरी आण्णा त्रिबंके (रा. नेप्ती) हा हातभट्टी दारूची विक्री करत असताना मिळून आला. त्याच्याकडून 33 लिटर दारू जप्त केली. नितिन दत्तात्रय रायपल्ली (रा. पंचरंग गल्ली) हा तोफखाना येथे दारू विकताना मिळून आला. त्याच्याकडून 20 लिटर दारू जप्त केली. सर्जेपुरा येथील संकल्प हॉटेल समोर गणेश भाऊसाहेब नागापुरे (रा. सर्जेपुरा) याच्या ताब्यातून 30 लीटर दारू जप्त केली. मंगलगेट हवेली येथे मच्छिंद्र रामभाऊ दानवे याच्या ताब्यातून 36 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...