Monday, June 24, 2024
Homeदेश विदेशहत्तीने बाप्पाच्या गळ्यात हार घालून केले स्वागत, पाहा VIRAL VIDEO

हत्तीने बाप्पाच्या गळ्यात हार घालून केले स्वागत, पाहा VIRAL VIDEO

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशभरात गणरायाचे मोठ्या उत्साहात (Ganesh Chaturthi) आगमन होत आहे. कुणी गणपतीसाठी मोदकाच्या तयारीला लागले आहेत तर कुणी गणपतीच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दरम्यान आता एका हत्तीचा अत्यंत खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

अजित पवार लबाड लांडग्याच पिल्लू अन् सुप्रिया सुळे…; गोपीचंद पडळकरची जीभ घसरली

या व्हिडीओमध्ये चक्क हत्तीनं बाप्पाचं स्वागत केलंय. बाप्पाच्या गळ्यात हार घालून गजराजनं बाप्पाचं आपल्या हटके स्टाईलने स्वागत केलंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची मोठी मिरवणूक सुरू आहे. यावेळी सारेच जण गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यात तल्लीन होऊन थिरकताना दिसत आहेत. त्याचवेळी एक हत्ती आपल्या सोंडेत फुलांनी सजवलेला हार पकडून गणपती बाप्पा जवळ येताना दिसतो. लोकांच्या गराड्यात तो गणपतीसमोर उभा राहतो आणि आपल्या सोंडेने गणपतीच्या गळ्यात हार घालताना दिसतोय.

सफरचंदाचा भाव कमी करण्यास सांगितल्याने विक्रेत्याने घातला ग्राहकाच्या डोक्यात कोयता 

व्हायरल झालेला हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. लोक मोठ्या श्रद्धेने या व्हिडीओला पाहताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत १२ हजार लोकांना लाईक केलं आहे. तर जवळपास १५०० लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या