Thursday, January 8, 2026
Homeनगरगणेशनगर येथे तरूणाची हत्या

गणेशनगर येथे तरूणाची हत्या

कुर्‍हाड, चाकून वार, दोघे ताब्यात, दोनजण पसार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जुन्या भांडणाच्या कारणातून तरूणाची कुर्‍हाड आणि चाकूचा वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना गणेश सहकारी साखर कारखाना परिसरात काल घडली. राहुल दिलीप पिंपळे (वय 23, रा. गणेशनगर, तालुका राहाता) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून दोघेजण पसार झाले आहेत. भाऊ भाऊसाहेब दिलीप पिंपळे यांनी फिर्यादीत म्हटले की, गणेशनगर कारखान्याच्या गेट समोर राहुल दिलीप पिंपळे हा 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आला असता जुन्या भांडणाच्या कारणावरून सोपान उर्फ रमेश पिंपळे, अनिकेत कडू त्रिभूवन (दोघे रा. कासवाडगाव ता. वैजापूर) अक्षय बाळासाहेब पडवळ, विजू वायकर (रा. गणेशनगर, ता. राहाता), यांनी मोटारसायकल आडवी लावून दमदाटी केली होती.

- Advertisement -

तसेच काल 1 ते 3 आरोपींनी कुर्‍हाड आणि चाकूने वार करून राहुलला ठार केले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती कळताच अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, तालुका पोलिस निरीषक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघांचाही शोध सुरू आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....