Friday, May 3, 2024
Homeधुळेधुळ्यात बुलेट चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद

धुळ्यात बुलेट चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. काल रात्रीच्या सुमारास जुने धुळे परिसरातून चोरट्यांनी दोन बुलेट लंपास केल्या आहेत.

- Advertisement -

एक बुलेटची चोरी करणारी टोळीच सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

जुने धुळे परिसरातील गायकवाड चौकात राहणारे चैतन्य हनुमंत वाडीले यांच्या मालकीची बुलेट (क्र. एमएच 18/11) मंगळवारी रात्री चोरीस गेली. आज सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाडीले यांनी त्यांच्याच घरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले.

तेव्हा रात्री पाच जणांच्या टोळक्याने बुलेट लांबविल्याचे चित्रफितीत दिसून येत आहे. याच भागातील वरखेडी रोडवर राहणार्‍या भगवान माळी यांच्या मालकीचीही बुलेटही चोरीस गेल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या