नवीन नाशिक | प्रतिनिधी
आज सायंकाळी चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून नवीन नाशिक मधील पवन नगर भागात दुचाकी तोडफोड, घरांच्या काचा फोडत, काहीतरी धारदार शास्त्राने मारण्याचा प्रयत्न करीत धूमाकूळ घालण्याचा प्रकार घडला आहे.यामुळे परिसरात महिला व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.
- Advertisement -
या टोळक्याने पवन नगर सह लोकमान्य नगर ,अष्टविनायक चौक ,अक्षय चौक या भागात असलेल्या नागरिकांच्या घरासमोर असलेल्या दुचाकी वाहनांची तोडफोड केली . काहींच्या घराच्या काचा फोडल्या . तर सरला कुमावत या महिलेच्या हातावर सायकल टाकून तिला जखमी केल्याचा प्रकार घडला.
या प्रकारानंतर काही नागरिकांनी यातील एकाला पकडून त्याला चांगलाच चोप दिला .यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले यातील अन्य संशयतांचा देखील पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.





