Thursday, June 20, 2024
Homeजळगावचोरीच्या दुचाकींची विल्हेवाट लावणारी टोळी जेरबंद

चोरीच्या दुचाकींची विल्हेवाट लावणारी टोळी जेरबंद

जळगाव – Jalgaon :

- Advertisement -

शहरातील वेगवेगळ्या भागातून मोटारसायकली चोरून त्याचे स्पेअर पार्ट वेगळे करून विल्हेवाट लावणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या तिघा आरोपींना अटक करुन सात दुचाकी वाहन त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत.

दुचाकी वाहन चोरून त्याचे सुटे भागांची परस्पर विक्री करून सुरत येथे मौजमजा करण्यासाठी निघालेल्या शाहरूख खान सलिम खान (वय20, रा. पाटील चक्की जवळ, सुप्रिम कॉलनी), अमन सैय्यद रशिद (वय18, अजिम किराणा दुकानाजवळ, सुप्रिम कॉलनी) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने मु.जे.महाविद्यालयाजवळ आज अटक केली.

दोघांनी 11 दुचाकी चोरल्या असून त्यापैकी 4 दुचाकी तिसरा सहकारी इमराज रमजान पटेल (वय21, रा. सुप्रिम कॉलनी) याला विल्हेवाट लावण्यासाठी दिल्या होत्या, त्याला देखील पथकाने अटक केली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय हिवरकर, राजेश मेढे, रवि नवाडे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या