Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशगँगस्टर अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार; भारतात दाखल होताच एनआयएने घेतलं ताब्यात

गँगस्टर अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार; भारतात दाखल होताच एनआयएने घेतलं ताब्यात

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला आज बुधवारी अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आणि दिल्लीला आणण्यात आले. त्याला विमानतळावर एनआयएने ताब्यात घेतले. अमेरिकेतून एकूण 200 जणांना हद्दपार करण्यात आले आहे, ज्यात भारतातील तीन जणांचा समावेश आहे. दिल्लीत आणल्यानंतर त्याला पटीयाला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अनमोल व्यतिरिक्त, आणखी दोघे पंजाबचे आहेत. गँगस्टर अनमोल हा एप्रिल 2024 मध्ये बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेतील एक वॉन्टेड आरोपी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल हा २०२२ साली बनावट पासपोर्टाच्या आधारे भारतातून पसार झाला होता. सुरुवातीला नेपाळ, दुबई, केनिया मार्गे पुढे अमेरिकेत गेला. काही वेळ अनमोल हा कॅनाडा येथे फिरत होता. कॅनडानंतर अमेरिकेत फिरणाऱ्या अनमोलला गृह सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले होते. अनमोल हा अमेरिकेतील स्थानिक पोलिसांच्या ताब्यात होता.

- Advertisement -

बाबा सिद्दीकीचें चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकीने मंगळवारी सांगितले की, त्यांना अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाकडून एक ईमेल मिळाला आहे ज्यामध्ये अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. झीशान म्हणाले की, अनमोलला भारतात आणून त्याच्या गुन्ह्यांसाठी खटला चालवावा.

YouTube video player

अनमोल बिश्नोईला दिल्ली विमानतळावर दाखल होताच एनआयएने ताब्यात घेतले. पटियाला हाऊस कोर्टात सादर केल्यानंतर एनआयए चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. त्याच्याविरोधात १८ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनमोल लॉरे्न्स बिश्र्नोई हा परदेशातील मुख्य हँडलर होता. खंडणी, धमक्याची प्रकरण नियंत्रण करत होता. चौकशीत घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे उघड होतील’.

अनमोलवर देशभरात अनेक खटले प्रलंबित आहेत. असे असले तरी एनआयए अनमोलची मे २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या, गेल्या वर्षी झालेली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारातील त्याच्या कथित भूमिकेची सर्वात आधी चौकशी करणार आहे.

लॉरेन्स टोळीचे जाळे जगभर पसरलेले आहे. असे म्हटले जाते की त्याच्या टोळीत 700 हून अधिक शूटर आहेत, त्यापैकी 300 हून अधिक पंजाबचे आहेत. ते पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातून काम करतात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...