Wednesday, March 26, 2025
Homeनगरगौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा!

गौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा!

जिल्ह्यातील सुमारे सात ते साडे सात लाख लाभार्थी घेणार लाभ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येत्या दोन ते तीन महिन्यांत विधानसभेच्या निवडणूक होणार्‍याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसू नये, यासाठी राज्यातील महायुती सरकारने राज्यातील गोरगरीब जनतेला गणेशोत्सवाचा सण आनंदाने साजरा करता यावा, यासाठी आनंदाचा शिधा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला 100 रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार आहे.

- Advertisement -

या आनंदाच्या शिधाचा जिल्ह्यातील सुमारे 7 ते साडेसात लाख लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. गैरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो रवा, चनाडाळ, साखर, व 1 लिटर तेल असा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत वितरीत केला जाणार आहे. यासाठी पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये रास्त भावात लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने 560 कोटी रुपयांच्या खर्चास नुकतीच् मान्यता दिली असून तसे परिपत्रक काढले आहे. लोकसभेत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजणा सुरू करून प्रत्येक पात्र महिलांना 1 हजार 500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी राज्यासह जिल्ह्यात युध्द पातळीवर काम सुरु आहे. आता सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी गोरगरीब जनतेला गणेशोत्सवाचा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी आनंदाचा शिधा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला शंभर रुपये आनंदाचा शिधा मिळणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...