Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik News : गॅरेज मालकाचा प्रामाणिकपणा; ११ लाखांचा मुद्देमाल असलेला डबा केला...

Nashik News : गॅरेज मालकाचा प्रामाणिकपणा; ११ लाखांचा मुद्देमाल असलेला डबा केला परत

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

बाहेरगावी देव दर्शनाकरिता तिरुपती बालाजी येथे गेलेल्या असतांना महिलेचे घराची मागची खिडकी उघडुन सोन्याचे दागिण्यांचा डबा अज्ञात व्यक्ती घेवून गेले होता.सदरचा डबा विजय नगर, पंचवटी (Panchvati) येथील गॅरेज बाहेर गॅरेज मालकास मिळून आला असता त्यांनी तो प्रामाणिकपणाने पंचवटी पोलीस स्टेशन (Panchvati Police Station) येथे जमा केला असून त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -

दिंडोरी रोडवरील (Dindori Road) महालक्ष्मी टॉकीजच्या मागील बाजूस राहणाऱ्या कमलाबाई भूगुरमल पमवानी या (दि ०१) रोजी रात्री देव दर्शनाकरिता तिरुपती बालाजी येथे गेलेले असतांना, कोणीतरी अज्ञात इसमाने पमवानी यांच्या घरात ठेवलेला डबा घेऊन गेला होता.सदरचा मुद्देमाल असलेला डबा तुषार प्रभाकर आढाव यांना त्यांचे विजय नगर येथील गॅरेजचे बाहेर पडलेला मिळून आला.

हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाची दमदार हजेरी; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

यानंतर तुषार आढाव यांनी सदचा डबा उघडून पाहिला असता त्या डब्यात (Box) ठेवलेले सोन्याचे, चांदीचे दागिने, नाणे, रोख रक्कम व एल आय सीच्या पावत्या असे होते. त्यावरून त्यांनी आजू बाजूस शोध घेतला मात्र त्याचा शोध न लागल्याने तुषार आढाव यांनी सदर मुद्देमाल असलेला डबा पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अमित शिंदे यांच्या मदतीने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे सुपूर्त केला.

यावेळी डब्यातील मुद्देमाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वर्षा पाटील, पोलिस शिपाई अमित शिंदे, महिला पोलीस शिपाई सोनाली भालेराव यांनी बेवारस मिळून आल्याने त्याचा टंच काढून वजनाप्रमाणे तुषार आढाव यांच्याकडून पंचनामा करून १४.५ तोळे सोने व २७ भार चांदी एकूण ११ लाख १८ हजार १७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.त्यावेळी पंचनाम्या दरम्यान सदर डब्यातील मिळालेल्या एल.आय.सी. पावतीच्या आधारे कमलाबाई भुगुरमल पमवानी यांचा पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत शोध घेण्यात आला.

हे देखील वाचा : Nashik News : गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या १५ जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका

त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या देव दर्शनावरून परत आल्या असल्याची माहिती मिळताच त्यांच्याकडून सदरचा मुद्देमाल त्यांचाच असल्याची खात्री करून पंचवटी पोलिस ठाण्यात तुषार प्रभाकर आढाव यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या समोर कमलाबाई भुगुरमल पमवानी यांना परत करण्यात आला. तसेच कमलाबाई पमवानी यांचा घरातून सोन्याचे दागिन्यांचा डबा पळवून नेणाऱ्या अज्ञाताचा शोध पंचवटी पोलिस (Panchvati Police) घेत आहे.

दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्यात गॅरेज मालक तुषार प्रभाकर आढाव यांचा पंचवटी पोलीस स्टेशन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मधुकर कड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देवुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक वर्षा पाटील पोलिस शिपाई अमित शिंदे व इतर अधिकारी व अंमलदार व तक्रारदार कमलाबाई भुगुरमल पमवानी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...