Saturday, September 21, 2024
Homeनगरगॅस स्फोटात माय लेकिच्या मृत्यु प्रकरणी पतीसह बारा जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा...

गॅस स्फोटात माय लेकिच्या मृत्यु प्रकरणी पतीसह बारा जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

तालुक्यातील बेलापूर येथील गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात गॅस टाकीच्या स्फोटात संशयास्पद मरण पावलेल्या ज्योती शशिकांत शेलार व मुलगी नमोश्री शशिकांत शेलार या नऊ वर्षीय मायलेकिंच्या मृत्यूप्रकरणी पती शशिकांत शेलार यांच्यासह अन्य बारा जणांच्या विरुद्ध श्रीरामपूर न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 302 अन्वये खुनाचा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदारांची महसूलमंत्री ना. विखे यांनी काढली खरडपट्टी

दि 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान हा गॅसचा स्फोट झाला होता.त्यात या दोघी मायलेकीचा बळी गेला होता. घटनेनंतर गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने बनाव करुन तसेच सुनियोजित कट करुन गुप्त धनाच्या लालसेपोटी आपली बहीण व भाचीची हत्या करुन पुरावे नष्ट केले असल्याची फिर्याद मयत महिलेचा भाऊ राजेंद्र कचरू नन्नवरे रा. पिंपळाचा मळा, ता. राहुरी यांनी श्रीरामपूर न्यायालयात फिर्याद दिली होती.

महाविकास आघाडी सरकार हे महावसुलीचे सरकार होते – महसुलमंत्री ना. विखे

त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी , श्रीरामपूर यांचे जाक्र.3379/2022 सी. आर्.पी. सी. दि.19/09/2022 अन्वये या प्रकरणी पती शशिकांत अशोक शेलार, अशोक ठकाजी शेलार, लीलाबाई अशोक शेलार, बाळासाहेब अशोक शेलार, कविता बाळासाहेब शेलार, पवण बाळासाहेब शेलार, रा.बेलापुर काजल किशोर खरात, सुखदेव खरात अनिकेत पाटोळे रा. कोल्हार तसेच गागरे बाबा, सांगळे बाबा, देवकर गुरु या आरोपींच्या विरुद्ध भादवी कलम 302,201,34 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक करणेसाठी अधिनियम 2013 चे कलम 3(1),(2) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर काहींनी पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने तपासाची दिशा भरकटली होती. असा आरोप फिर्यादीने केला होता. संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणी खळबळ उडाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या