Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधआली गौराई ; सोन्या रूपयाच्या पावली

आली गौराई ; सोन्या रूपयाच्या पावली

भाद्रपद महिन्यात श्री गणेशाच्या आगमनानंतर घरोघरी गौराईचे मोठ्या थाटामाटात आगमन होते. कुठकुठे त्यांची स्थापना लक्ष्मीपूजन म्हणून होते तर कोठे गौरीपूजन म्हणून त्यांची स्थापना केली जाते. असा हा गौरी पुजनाचा सण मोठ्या उत्साहात भक्तीभावात व आनंदात साजरा केला जातो. चला पाहूयात त्या सणाविषयी सविस्तर माहिती.

भाद्रपद महिन्यात आपल्या घरी आधी गणपती बापांचे आगमन होते व काही दिवसांनंतर लगेच गौरीचे आगमन होते. काही कथांमध्ये असे म्हटले जाते की, गणपतीचे आगमन झाले त्यानंतर लगेच गणपती बाप्पा आपल्या बहिणीला आपल्या घरी घेऊन येतात. असे त्या कथेमध्ये सांगितले जाते. तीन दिवस माहेरपणाला आलेल्या गौरी घरात आनंदाचे वातावरण घेऊन येतात. पहिला दिवस त्यांच्या आगमनाचा असतो. तर दुसरा दिवस त्यांचा पाहुणचार व त्यांना पक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि तिसरा दिवस त्यांच्या विसर्जानाचा असतो. असे एकूण तीन दिवस गौरीपूजन हा सण साजरा केला जातो. अनुराधा नक्षत्रावर गौरीपुजनाची स्थापना केली जाते व ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर गौरीपुजनाचे विसर्जन केले जाते. असा एकूण 3 नक्षत्रावर हा सण साजरा केला जातो.

- Advertisement -

परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात.

गौरी पूजन पहिला दिवस

प्रत्येक ठिकाणी गौरी पूजन हे विविध पद्धतीने आणि परंपरेनुसार केले जाते. कोणाकडे धातूची तर काही ठिकाणी मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून पूजली जाते. तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.

गौरी पूजन दुसरा दिवस

दुसर्‍या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होतं. या दिवशी पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.

गौरी विसर्जन तिसरा दिवस

तिसर्‍या दिवशी मूल नक्षत्रात गौरीचे खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात. या दिवशी कापसाचे गाठ बांधतात. सूतामध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, रेशीम धागा मिसळतात. गौरी पूजन करुन आरती करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या