Friday, May 16, 2025
Homeजळगावसोन पावलांनी गौरींचे उत्साहात आगमन

सोन पावलांनी गौरींचे उत्साहात आगमन

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

- Advertisement -

बाप्पांचे आगमना पाठोपाठ रविवारी ज्येष्ठा गौरींचेही (Gauri’s) घरोघरी सोनपावलांनी (golden steps) चाकरमान्यांच्या उपस्थितीत आगमन (arrival) झाल्याने परिवार गोकुळात भक्तीरंगात (In devotion) सर्व भाविकांनी गणपती बाप्पांसह ज्येष्ठा – कनिष्ठा गौरींना कोरोना आजारापासून सगळ्यांची सुटका करा, अशी प्रार्थना केली.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भाव असल्याने गेल्यावर्षी बाहेरगावी नोकरी- व्यवसाय करणा-यांना या सणांच्या काळात देखील गावी येता आले नव्हते, परंतु कोरोनाबाबत शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच लसीकरण उपाययोजनांमुळे यंदा चाकरमानी मंडळी गणपती बाप्पा व ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त गावी आलेली असल्याने घरांचे रूपांतर गोकुळात झाल्याचे चित्र दिसले.

आज ज्येष्ठा गौरींचे पूजन केले जाणार आहे. यासाठी नैवेद्यात 16 भाज्या असून त्यात गवार, भेंडी, दोडके, गिलके चाकी, गंगाफळ, तोडले, चाकवद, सुरण, आंबटचुका, वाल, वटाणे, भोपळा, काकडी, बटाटे व पडवळीचे महत्त्व असते. तसेच सांजोर्‍या, करंजी, लाडू, पुरणपोळी, अंबील यासह पंचामृताचा समावेश असतो. काही ठिकाणी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढीत मनमोहक सजावट करित आकर्षक उभ्या गौरी तसेच चौरंगावर मुखवटे ठेवीत आरास केलेली दिसून आली. उद्या मंगळवारी ज्येष्ठा गौरींचे विसर्जन केले जाणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...