Friday, June 28, 2024
Homeक्राईमगावठी कट्टा दाखवुन धमकविणारा जेरबंद

गावठी कट्टा दाखवुन धमकविणारा जेरबंद

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

दुचाकीचा कट मारून गावठी कट्ट्याने (Gavathi Katta) धमकाविणार्‍यास कोपरगाव शहर पोलिसांनी (Kopargav City Police) रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास जेरबंद केले. त्यााच्याकडून गावठी कट्ट्यासह 55 हजारांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला. त्याचा साथीदार फरार झाला आहे. ही घटना कोपरगाव शहरानजिक जनार्दन स्वामी ट्रस्टच्या मंगल कार्यालजावळ घडली.

रविवारी रात्री नगर-मनमाड रस्त्यावरील (Nagar Manmad Highway) संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्टच्या मंगल कार्यालयाच्या कमानीजवळ मयुर नवनाथ औताडे रा. पोहेगाव, व शुभम सोनवणे रा. कौठे, ता. सिन्नर, या दोघांनी त्यांच्या जवळील (एमएच 17 डीबी 5950) क्रमांकाच्या दुचाकीने चंद्रकांत जोर्वेकर यास कट मारला. त्यांना थांबवून वाद (Dispute) घालीत गावठी कट्ट्याने धमकावले. त्याच वेळी पोलिसांनी मयूर औताडे यास अटक (Arrested) केली. त्याच्या ताब्यातून दुचाकी व गावठी कट्टा असा एकूण 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

घटनास्थळावरून शुभम सोनवणे हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल तावरे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भांमरे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या