Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्याIsrael Attack Gaza : लष्करी हालचालींना वेग! गाझातील नागरिकांना ३ तासांची डेडलाईन

Israel Attack Gaza : लष्करी हालचालींना वेग! गाझातील नागरिकांना ३ तासांची डेडलाईन

दिल्ली | Delhi

- Advertisement -

इस्राइलच्या लष्कराने गाझा पट्टीतील कारवाई तीव्र केली आहे. लष्कराने गाझाच्या नागरिकांना तीन तासांचा वेळ दिला आहे. नागरिकांना एक रस्ता दिला असून गाझाच्या उत्तर भागातून दक्षिण भागात तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्राइल लष्कर गाझा पट्टीचा उत्तर भाग पूर्णपणे ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

इस्राइली डिफेन्स फोर्सने यासंदर्भातील एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की, ‘गाझामध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कोणतेही ऑपरेशन लाँच केले जाणार नाही. या काळात नागरिकांनी दक्षिणेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे’. या वेळेनंतर इस्राइली लष्कर तीव्र कारवाईला सुरुवात करणार आहे. इस्राइलकडून ‘पाथ टू सेफ्टी’ जारी करण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान गाझाच्या नागरिकांनी यावेळेत या मार्गावरुन दक्षिण भागात सुरक्षित जावे. त्यांना कोणतीही हानी पोहोचवली जाणार नाही. याकाळात कोणतेही ऑपरेशन राबवले जाणार नाही. नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असं इस्राइली लष्कराने म्हटलं आहे.

इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. हमासचा खात्मा करण्याच्या उद्धिष्टाने इस्त्रालय सैन्य गाझामध्ये दाखल झालं आहे. इस्त्रायल लष्कराचे टँक आणि शस्त्रधारी वाहनं सतत गाझाच्या सीमेवर दाखल होत आहेत. इस्त्रायलला आता कोणत्याही स्थितीत गाझा पट्टीचा ताबा मिळवायचा आहे. याचसाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू शनिवारी गाझा पट्टीच्या बाहेर जवानांना भेटण्यासाठी पोहोचले होते. इस्त्रायलने हमासला मुळापासून नष्ट करण्याची शपथच खाल्ली आहे. आयडीएफने गाझाच्या चारही बाजूंना ३ लाख सैनिकांना तैनात केलं आहे.

एका आठवड्यापासून सुरु असलेल्या या युद्धात इस्त्रायलच्या १३०० लोकांचा मृत्यू झाला असून, २८०० जण जखमी झाले आहेत. तर हमासच्या १९०० जणांचा मृत्यू झाला असून, ८००० जण जखमी आहेत. इस्त्रायलने आतापर्यंत ६००० पेक्षा अधिक हवाई हल्ले केले आहेत. तर हमासच्या हल्ल्यांची संख्या ३००० असल्याचं सांगितलं जात आहे. इस्त्रायल रोज ७०० रॉकेट हल्ले करत आहे. तर हमासची संख्या ४०० आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या