Saturday, November 16, 2024
Homeशैक्षणिकभूगर्भ विज्ञानाची वेगळी वाट

भूगर्भ विज्ञानाची वेगळी वाट

करियर म्हटलं की डोळ्यासमोर येते ते डॉक्टर किंवा इंजिनिअर. कारण काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनिअर झाली की, तिचे करियर घडले असे समजले जात होते. अलिकडच्या काळात मात्र आता चित्र वेगळे दिसू लागले आहे. प्रत्येक तरुण किंवा तरुणी इतरांपेक्षा काहीतरी वेगळ्या क्षेत्रात करियर करण्याबाबत उत्सुक दिसून येतात. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे कोणत्याही क्षेत्राची किंवा अभ्यासक्रमाची माहिती आपल्याला चटकन मिळू शकते. वेगळ्या धाटणीचे करियर आपल्याला समाधान देतातच परंतु वेगळ्या विश्‍वात काम केल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. आता पृथ्वीशी संबंधित अनेक क्षेत्र आहेत, की जेथे आपण प्राविण्य मिळवून करियर करू शकतो. अशा अभ्यासक्रमाची निवड केल्यास आपल्या करियरला आपण वेगळी दिशा देऊ शकतो. पुढीलप्रमाणे आपल्याला विविध क्षेत्राची माहिती घेता येऊ शकेल.

ओशनोग्राफी : ओशनोग्राफीमध्ये समुद्र आणि समुद्रात आढळून येणार्‍या प्राण्यासंदर्भात अभ्यास केला जातो. विज्ञान शाखा निवडणार्‍या विद्यार्थ्यांना ओशनोग्राङ्गीचा अभ्यासक्रम निवडू शकतात. हा अभ्यासक्रम साधारणत: तीन वर्षांचा असतो. त्यात जुलॉजी, ङ्गिजिक्स, केमिस्ट्री, जिओलॉजी आणि वेदर सायन्सचा समावेश आहे. बहुतांशी कॉलेज आणि विद्यापीठात ओशनोग्राङ्गी आणि मरिन बायलॉजीशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रमच उपलब्ध आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजेच बीएससी (जिओलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, ङ्गिशरिज सायन्स, अर्थ सायन्स, ङ्गिजिक्स, अ‍ॅग्रीकल्चर, मायक्रोबायलॉजी, अप्लाइड सायन्स यापैकी कोणताही एक विषय असणे अनिवार्य आहे.या क्षेत्रात एमएससी ओशनोग्राङ्गी, एमएससी मरिन बायलॉजी, एमटेक इन ओशनोग्राङ्गी, एमएससी मरिन बायलॉजी, एम.ङ्गील मरिन बायलॉजी, एम.ङ्गील केमिकल ओशनाग्राङ्गी किंवा ओशनोग्राङ्गीमध्ये पीएच.डी करू शकतो. सर्वसाधारणपणे या क्षेत्रात नमूने एकत्र करणे, सर्व्हेक्षण आणि अत्याधुनिक उपकरणातून डाटा गोळा करण्यासारखे काम केले जाते. या क्षेत्रात काम करण्यार्‍यास ओशनोग्राङ्गर म्हटले जाते. यात पाण्याचा वेग, प्रवाहाची दिशा आणि त्याच्या ङ्गिजिकल आणि केमिकल तत्वावर लक्ष ठेवले जाते. ओशनोग्राङ्गीच्या माध्यमातून आपल्याला समुद्र किनारा परिसर आणि परिसरावर होणारा परिणामाची माहिती कळत. या क्षेत्रात अधिकाधिक केमिस्ट, ङ्गिजिस्ट, बायलॉजिस्ट आणि जिओलॉजिस्ट काम करतात. ओशनोग्राङ्गर्स हे सरकारी आणि खासगी संघटनांत सायन्स इंजिनिअर किंवा टेक्निशियन म्हणून नोकरी करू शकतात.

- Advertisement -

जिओग्राफी : जिओग्राफी क्षेत्रात करियर करण्यासाठी अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत. जिओग्राङ्गी एक्स्पर्ट रिमोट सेसिंग एजन्सी, मॅप एजेन्स, ङ्गूड सिक्युरिटी, बायोडायव्हर्सिटी क्षेत्रातही विविध पदावर नोकरी करू शकतो. या क्षेत्रातच आपल्याला पुढे जायचे असेल तर स्पेशलायजेशनबरोबरच मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे. अनेक शैक्षणिक संस्था आहेत की ज्या या क्षेत्रात बीएससी आणि बीए पदवीचे अभ्यासक्रम शिकवतात. विज्ञान किंवा कला शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमास पात्र ठरू शकतात. अनेक संस्था प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन करतात. जिओग्राङ्गी क्षेत्रात नोकरीच्या संधी अनेक आहेत. ट्रान्सपोर्टेशन, पर्यावरण विज्ञान, एअरलाइन रुट, शिपिंग रुट प्लानिंग, सिव्हिल सर्व्हिसेस, कार्टोग्राङ्गी (नकाशा तयार करणे), सॅटेलाइट तंत्रज्ञान, हवामान विभाग, शिक्षण, आपत्कालिन विभाग यासारख्या अनेक ठिकाणी आपल्याला नोकरीच संधी मिळू शकते.

कार्टोग्राफी : व्यावसायिक कार्टोग्राङ्गरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कार्टोग्राङ्गर होण्यासाठी बॅचलर ऑङ्ग कार्टोग्राङ्गीचा अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे. अर्थ विज्ञान किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर विद्याथीर्र् या क्षेत्रात करियर करू शकतात. कार्टोग्राङ्गर सायंटिङ्गिक टेक्नॉलॉजिकल आणि जिओग्राङ्गिकल इन्ङ्गॉरमेशनला डायग्राम, चार्ट, स्प्रेडशिट आणि नकाशा रुपात सादर करू शकतो. यात डिजिटल मॅपिंग आणि जिओग्राङ्गिकल इन्ङ्गॉरमेशन सिस्टिम (जीआयएएस) सर्वात जास्त उपयुक्त ठरते. तसे पाहता नकाशाचा उपयोग व्यक्तिगतपासून ते औद्योगिक कारणासाठी केला जातो. त्यासाठी प्लॅनर्स, यूटिलीटी कंपन्या, स्टेट एजन्सिज, कंस्ट्रक्शन कंपनी, सर्व्हेशक, आर्किटेक्टस या मंडळींना कार्टोग्राङ्गरची गरज पडते. यानुसार वेदर ङ्गोरकास्टिंग, ट्रॅव्हल अँड टूरिझम, जिओलॉजिकल, मिनरल एक्सप्लोरेशन, मिल्ट्री डिपार्टंमेट पब्लिशिंग हाऊसमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी आहेत.

जिओफिजिक्स : जिओफिजिक्समध्ये पृथ्वीशी संबंधित अभ्यास केला जातो. प्रारंभीच्या काळात या अभ्यासक्रमाचे क्षेत्र केवळ भूकंपाशी संलग्न होते. मात्र आता या क्षेत्राचा, अभ्यासक्रमाचा विस्तार झाला आहे. प्लेट टेक्नोनिक्ससारख्या सिद्धांतांनी या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढविली आहे. तसे पाहिले तर सर्वसाधारण व्यक्तींना पृथ्वीच्या अंतर्गत आणि बाह्य क्षेत्रात घडणार्‍या घडणार्‍या घडामोडींची ङ्गारशी माहिती कळत नाही. मात्र जिओङ्गिजिस्ट हा केवळ पृथ्वीतील आतील भागाचे रहस्य उलगडत नाही तर पृथ्वीच्या पोटात काय गडबड चालू आहे, हेसुद्धा समजत असते. आज जिओङ्गिजिस्टची गरज नॅचरल गॅस आणि पेट्रोलियम पदार्थाच्या खाणीचा शोध घेण्यासाठी होतो. याशिवाय ऊर्जा, वातावरणाशी संबंधित कामातही जिओङ्गिजिस्टची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर खाण शोधण्यासाठीही मोलाची मदत करतात. जिओङ्गिजिक्सशी संबंधित प्रोङ्गेशनल्ससाठी ऑइल आणि गॅस इंडस्ट्री, इन्व्हायरमेंट कन्सलटिंग कंपनी, नॅशनल जिओग्राङ्गी रिसर्च इन्स्टिट्यूट, मिल्ट्री एज्यूकेशन इन्स्टिट्यूट आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या