Thursday, January 8, 2026
Homeनगरआठ दिवसांत 81 हजार घरकुलांना मंजुरी!

आठ दिवसांत 81 हजार घरकुलांना मंजुरी!

केंद्रीय मंत्री शहा यांच्याहस्ते उद्या ऑनलाईन मंजुरीच्या पत्रासह पहिला हप्ता होणार वितरीत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्ह्यासाठी 82 हजार 968 घरकुल लाभार्थींचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यापैकी 81 हजार 15 (97.6 टक्के) लाभार्थींना घरकुले मंजूर केली आहेत. ही प्रक्रिया जिल्ह्याने 8 दिवसांत पूर्ण केली आहे. घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना मंजुरी पत्र देणे व मंजूर लाभार्थींपैकी 10 लाख लाभार्थींना प्रथम हप्ता एकाचवेळी (ऑनलाईन एकाच क्लिकवर) वितरण शनिवारी (दि. 22) दुपारी 4.45 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज़ मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा 2 मधील घरकुल लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण शनिवारी केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने सहकार सभागृहात दुपारी 3 वाजता होणार असून त्यास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत सन 2024-25मध्ये महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाकडून 20 लाख लाभार्थ्यांचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले. या उद्दिष्टापैकी महाराष्ट्र राज्याने 18.25 लाख (93 टक्के) लाभार्थींना घरकुले मंजूर केले आहेत. मंजुरीची प्रक्रिया राज्यात 15 दिवसांत पूर्ण करण्यात आली.

YouTube video player

हा कार्यक्रम बालेवाडी (पुणे) येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दूरदृष्यप्रणालीव्दारे जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर घरकुल लाभार्थींना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सहकार सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा आयोजित करुन लाभार्थींना सरपंच व गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या हस्ते मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण पत्र देण्यात येणार आहे.

50 हजार 174 लाभार्थींना मिळणार पहिला हप्ता
नगर जिल्ह्यातील एकूण 81 हजार 15 लाभार्थींना घरकुल मंजुरीचे पत्र व शासनाने प्रथम हप्ता वितरणासाठी दिलेल्या 46 हजार 196 उद्दिष्टापेक्षा जास्त 50 हजार 174 (109 टक्के) लाभार्थींना प्रथम हप्त्याचे वितरण होणार आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...