Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘घरकुल’साठी नव्याने 1 लाख 62 हजार ऑनलाईन अर्ज

Ahilyanagar : ‘घरकुल’साठी नव्याने 1 लाख 62 हजार ऑनलाईन अर्ज

आवास प्लस योजनेची मुदत संपली || आता दाखल फॉर्मची पडताळणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

2018 मध्ये आवास प्लस ऑनलाईन सर्वेक्षणमधील तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश नसलेल्या, यंत्रणेद्वारे अपात्र ठरलेल्या आणि सद्यस्थितीत पात्र असलेले मात्र शासनाच्या घरकुलाच्या ‘ड’ यादीत नावे नसणार्‍या कुटुंबासाठी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत गेल्या दोन महिन्यांत नव्याने ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात नगर जिल्ह्यात 1 लाख 62 हजार 230 कुटूबांनी नव्याने अर्ज केलेले असून आलेल्या नावांची ऑनलाईनसह गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ऑफलाईन पडताळणी करण्यात येवून नव्याने घरकुल पात्रांची यादी तयार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी शासनाने 2012 मध्ये गावनिहाय आवास प्लस हे ऑनलाईन सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे शासनाने 2018 मध्ये घरकुलासाठी गावनिहाय लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली होती. या प्रतीक्षा यादीतून लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून घरकुलाचा लाभ टप्प्याटप्प्याने देण्यात येत होता. पहिला टप्प्यामध्ये प्रतिक्षा यादीतील लाभार्थी मार्च 2025 पर्यंत उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. त्याप्रमाणे लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात येऊन 15 हजार रुपये पहिला हप्ता खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे.

YouTube video player

2018 मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणच्या प्रतिक्षा यादीमध्ये अनेक पात्र कुटुंबाचा समावेश नसल्याने या कुटुंबांना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी मागील काही वर्षापासून लाभार्थी कुटुंबाकडून सातत्याने केली जात होती. यामुळे शासनाने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत 18 एप्रिल ते 18 जून या कालावधीत पात्र कुटुंबाची सर्वेक्षण मोहिम ऑनलाईन मोहिम राबवली. यात एकट्या नगर जिल्ह्यात 1 लाख 62 हजार लाभार्थी कुटूंबांनी घरकुलासाठी अर्ज केलेले आहेत.

आतापर्यंत 2 लाख 35 हजार 639 घरकुल
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राज्य सरकारने आतापर्यंत 2 लाख 35 हजार 639 घरकुलांची कामांना मंजूरी दिलेली आहे. यात प्रधानमंत्री घरकुल योजनेतील 1 लाख 79 घरकुलांचा समावेश आहे. घरकुल योजनेत पात्र ठरलेल्या कुटूंबाला सरकारच्यावतीने जवळपास घर बांधण्यासाठी जवळपास 2 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते.

नव्याने आलेले अर्ज
अकोले 12 हजार 528, जामखेड 12 हजार 952, कर्जत 13 हजार 333, कोपरगाव 9 हजार 838, नगर 9 हजार 263, नेवासा 14 हजार 258, पारनेर 10 हजार 886, पाथर्डी 12 हजार 115, राहाता 8 हजार 474, राहुरी 10 हजार 182, संगमनेर 16 हजार 434, शेवगाव 8 हजार 977, श्रीगोंदा 10 हजार 931, श्रीगोंदा 12 हजार 59 यांचा समावेश आहे. यात 1 लाख 13 हजार 584 कुटूंंबांनी स्वत: घरकुल सर्वेक्षणात सहभागी होत ऑनलाईन अर्ज केलेला आहे तर 48 हजार 646 लाभार्थ्यांनी यंत्रणेची मदत घेत घरकुल सर्वेक्षणात सहभागी नोंदवला आहे.

पक्के घर असतांना घरकुलासाठी अर्ज
जिल्ह्यात अनेक ठिकाणी लाभार्थी यांच्याकडे पक्के घर असतांना नव्याने ऑनलाईन घरकुल योजनेत नाव नोंदवली आहेत. आता या कुटूंबांना शोधून त्यांची नावे बाद करण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनेसमोर राहणार आहे. पुढील काही महिन्यांत ऑनलाईन आवास प्लस अ‍ॅपवर झालेल्या नोंदणी अर्जाची पडताळणीसोबत 20 टक्के अर्जाची गटविकास अधिकारी समक्ष भेटी देवून तपासणी करून खरोखर घरकुलासाठी पात्र आहेत की नाहीत, याची पडताळणी करणार आहेत.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...