Wednesday, April 16, 2025
HomeनगरAhilyanagar : कालव्यात दोन बहिणींसह ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा बुडून मृत्यू

Ahilyanagar : कालव्यात दोन बहिणींसह ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा बुडून मृत्यू

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील ताजू (Taju) गावाच्या शिवारामध्ये घोड कालव्यात (Ghod Canal) पोहण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा व त्यांना वाचवण्यासाठी गेलेला ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Water Drowning Death) झाला आहे. दिपाली वणेश साबळे (वय 14), ऐश्वर्या वणेश साबळे (वय 10), कृष्णा रामदास पवळ (वय 26) अशी मयतांची नावे आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घोड कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे.

- Advertisement -

याच कालव्याच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी (Swimming) दिपाली साबळे व ऐश्वर्या साबळे आणि आणखी दोन लहान मुले गेली असता कालव्यातील पाण्याचा वेग जास्त असल्याचा अंदाज न आल्याने हे चारही मुले पाण्यात बुडू लागली. यावेळी शेजारी शेतात काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा पवळ यांना या मुलांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ कालव्याकडे धाव घेतली.

त्यांनी कुठलाही विचार न करता पाण्यामध्ये उडी मारून दोन मुलांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र दोन मुलींना वाचवण्यासाठी (Girls Save) पुन्हा उडी मारली असता त्याचाही पाण्यामध्ये बुडवून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. या तिघांचे मृतदेह कर्जत (Karjat) येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू –...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai डिजिटल शिक्षणाच्या (Digital Eduation) दिशेने महाराष्ट्राची (Maharashtra) वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी...