Thursday, January 8, 2026
Homeनगरघोडेगावात कांदा आवक दुप्पट; भावातही वाढ

घोडेगावात कांदा आवक दुप्पट; भावातही वाढ

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारच्या तुलनेत आवकेत दुपटीने वाढ झाली. जास्तीत जास्त भावातही प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी वाढ झाली. शनिवारी 25 हजार 740 गोण्या कांद्याची आवक झाली.

- Advertisement -

एक नंबरच्या कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल 2900 ते 3000 रुपये भाव मिळाला. 2 नंबर 2700 ते 2800 रुपये, 3 नंबर 2500 ते 2600 रुपये, गोल्टा 1800 ते 2000 रुपये, गोल्टी -1200 ते 1500 रुपये तर जोड हलक्या डॅमेज कांद्याला (Onion) 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक भाव 2800 ते 2850 रुपयांपर्यंत निघाले.

YouTube video player

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...