Friday, December 6, 2024
Homeमुख्य बातम्याघोटी कृउबा निवडणूक निकाल जाहीर; कोणी मारली बाजी?; वाचा सविस्तर

घोटी कृउबा निवडणूक निकाल जाहीर; कोणी मारली बाजी?; वाचा सविस्तर

घोटी | जाकीर शेख Ghoti

सर्व तालुक्याचं लक्ष लागून असलेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा गुळवे राज आले आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत लोकनेते गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलने विरुद्ध असलेल्या शेतकरी परिवर्तनाच्या पॅनलचा धुवा उडवत सोळा जागांवर दणदणीत यश संपादित केले आहे.

- Advertisement -

लोकनेते गोपाळराव गुळवे शेतकरी पॅनल चे नेतृत्व माजी आमदार शिवराम झोले, अँड संदीप गुळवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी नेतृत्व केले आहे. दरम्यान पुन्हा एक हाती सत्त्ता बाजार समितीवर आणण्यात गुळवे यांना यश लागले आहे आणि गड आपल्याच ताब्यात ठेवत मतदारांनी विश्वास ठेवला असल्याची चर्चा आहे.

दुपारी चार वाजता मतदान झाल्यानंतर घोटी येथील जैन भवन येथे सहा वाजता मजमोजनी ला सुरुवात झाली यात रात्री ९ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तिन्ही पॅनलच्या निकालाची घोषणा करत लोकनेते गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलच्या १६ जागांचा निकाल घोषित केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

हे आहेत विजयी उमेदवार

सोसायटी गटातून निवृत्ती जाधव, सुनील जाधव, शिवाजी शिरसाठ, रमेश जाधव, भाऊसाहेब कड भाणे, अर्जुन पोर्जे, महिला राखीव मधून सुनीता गुळवे, आशा भाऊसाहेब खात ले, एन टी मधून ज्ञानेश्वर लहाने, ओबीसी मधून राजाराम धोंगडे, व्यापारी मधून नंदलाल पीचा, भरत आरो टे, हमाल मापरी मधून रमेश जाधव व ग्रामपंचायत गटातून संपत वाजे,अर्जुन भोर हे लोकनेते गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनल चे हे उमेदवार विजयी झाले तर शेतकरी परीवर्तन पॅनल चे दिलीप चौधरी व मारुती आघा न हे विजयी झाले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या