Friday, April 25, 2025
Homeनगरविद्यार्थिनीला लॉजवर नेवून मारहाण

विद्यार्थिनीला लॉजवर नेवून मारहाण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथे नर्सिंग कोर्ससाठी आलेल्या विद्यार्थिनीला तू माझ्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर का बोलत नाही, माझ्यासोबत रिलेशनशीपमध्ये राहा, असे म्हणत विद्यार्थिनीला लॉजवर नेवून तिला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन वाघ (रा.यवतमाळ जिल्हा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुणी ही यवतमाळ जिल्ह्यातील आहे. तिच्याशी 4 वर्षापासून गावातीलच एका तरुणाची ओळख होती. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. सदर तरुणी ही श्रीरामपूर येथे नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी आलेली असून ही तरुणी कॉलेजच्या आवारात असताना रोशन वाघ हा तेथे आला व त्याने तिला मोटारसायकलवर बसायला सांगितले.

- Advertisement -

पेपर चालू असल्याने तिने मोटारसायकलवर बसण्यास नकार दिला. तेव्हा रोशनने तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून शहरातील एका लॉजवर नेले. तेथे रूममध्ये नेवून तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये का राहत नाही? तू माझ्यासोबत व्हॉट्सअ‍ॅपवर का बोलत नाही? असे म्हणून मारहाण करत तिचा मोबाईल घेऊन बंद केला. त्यानंतर तिला बाहेर आणून मोटारसायकलवर बसवून बाभळेश्वरला नेले. त्यानंतर सदर तरुणीला त्याने बराचवेळ गाडीवर फिरवले. दरम्यान, मुलीचा फोन बंद असल्याने तिच्या वडिलांनी स्थानिक पोलिसांना कळवले. तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांचा रोशन याला फोन आल्यानंतर त्याने सदर तरुणीला रात्री 8 वाजता पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडून दिले. सदर तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोशन वाघ, (रा.यवतमाळ जिल्हा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...