Wednesday, July 29, 2026
Homeक्रीडाकॉमनवेल्थ स्पर्धेत एकाच दिवसात २ पदकं; गुलवीर सिंगने रचला इतिहास, भारताच्या खात्यात...

कॉमनवेल्थ स्पर्धेत एकाच दिवसात २ पदकं; गुलवीर सिंगने रचला इतिहास, भारताच्या खात्यात १२ पदकं

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Glasgow Common Wealth Games 2026) मध्ये भारतीय खेळाडूंची (Indian Players)दमदार कामगिरी कायम आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी दोन रौप्यपदकांची (Silver Medals) भर पडली. मंगळवारी रात्री उशिरा लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगने (Gulveer Singh) पुरुषांच्या १० हजार मीटर शर्यतीत दुसरे स्थान पटकावले. तो या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.

याशिवाय बॉक्सिंगमध्ये भारताचे किमान तीन पदके निश्चित झाली आहेत. या दोन रौप्यपदकांमुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या १२ वर पोहोचली असून पदकतालिकेत भारताने नववे स्थान गाठले आहे. भारताच्या खात्यात सध्या २ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १२ पदके जमा झाली आहेत.

- Advertisement -

गुलवीर सिंगने स्कॉटस्टाउन स्टेडियममध्ये मुसळधार पाऊस आणि ओल्या ट्रॅकवर 27.49.78 सेकंदांची वेळ नोंदवली. ऑस्ट्रेलियाच्या काई रॉबिन्सनने सुवर्ण आणि आयल ऑफ मॅनच्या मुल्लार्कीने कांस्य पदक जिंकले. तर, गुलवीरने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या १० हजार मीटर शर्यतीत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय पुरुष खेळाडू ठरला.

Nashik Crime News: दिंडोरीत अवैध पानमसाला व तंबाखूची ट्रॅव्हल्समधून तस्करी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

हरजिंदर कौरची शानदार कामगिरी
महिलांच्या 69 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या 29 वर्षीय हरजिंदर कौरने शानदार प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावले. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 227 किलो वजन उचलले. स्नॅच फेरीत हरजिंदरने अनुक्रमे 96 किलो, 99 किलो आणि 101 किलो वजन यशस्वीरीत्या उचलले. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये तिने 120 किलो, 123 किलो आणि अखेरच्या प्रयत्नात 126 किलो वजन उचलत एकूण 101 + 126 = 227 किलो वजनाची नोंद केली.

भारताच्या खात्यात १२ पदके
सहाव्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात एकूण 12 पदके जमा झाली आहेत. त्यामध्ये 2 सुवर्णपदके, 7 रौप्यपदके आणि 3 कांस्यपदके अशा एकूण 12 पदकांसह भारत पदकतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम असून त्यांनी 35 सुवर्णांसह एकूण 80 पदके जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भारतीय खेळाडूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आगामी दिवसांतही भारताच्या पदकसंख्येत आणखी वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या