Wednesday, July 29, 2026
Homeक्राईमNashik Crime News: दिंडोरीत अवैध पानमसाला व तंबाखूची ट्रॅव्हल्समधून तस्करी; तब्बल 'इतक्या'...

Nashik Crime News: दिंडोरीत अवैध पानमसाला व तंबाखूची ट्रॅव्हल्समधून तस्करी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

​दिंडोरी | प्रतिनिधी
गुजरात (Gujrat) राज्यातून महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीसाठी बंदी असलेला सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची अवैध (Illegal Panmasala & Tobacco) वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसवर (Travels) दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. नाशिक-पेठ रोडवरील (Nashik Peth Road) आशेवाडी शिवारात हॉटेल श्रीकृष्णासमोर सापळा रचून पोलिसांनी ट्रॅव्हल्ससह २६ लाख ४४ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​दिंडोरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे, गुजरात राज्यातून ट्रॅव्हल्स क्र. AR 20 A 5370 या बस मधून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व पानमसाला नाशिकच्या दिशेने नेला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे, पोलीस हवालदार धुमाळ, पालवी, मोरे, पानसरे यांच्या पथकाने नाशिक-पेठ रस्त्यावर आशेवाडी शिवारात सापळा रचला. मंगळवार​ दिनांक २८ जुलै २०२६ रोजी पहाटे ३:२० वाजेच्या सुमारास संशयित ट्रॅव्हल्स बस येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवली. वाहनाची झडती घेतली असता डिकीमध्ये पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला अवैध पानमसाला व तंबाखूचा साठा आढळून आला. यामध्ये ​रजनीगंधा पान मसाला किमत ६२,४०० रुपये, ​तुलसी व रॉयल जाफरानी जर्दा किमत ५२,८७५ रुपये ​हिरा पान मसाला किंमत १९,६८० रुपये, ​रॉयल ७१७ टोबॅको किंमत ९,८४० रुपये व अशोक लेलँड शिहोरी ट्रॅव्हल्स ३६ सीटर बस किंमत २५,००,००० रुपये एकूण २६,४४,७९५ रुपये जप्त केला, ट्रॅव्हल्स चालक महेश दत्तु सुर्यवंशी (वय ३८, रा. कारेली गंगाधरा, ता. जि. बलसाड, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान हा मुद्देमाल नाशिक येथील नथनी आमेर आनीस याने मागविल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

संपादकीय : २९ जुलै २०२६ – ग्राहक हक्कांची डिजिटल चळवळ

​दरम्यान, याप्रकरणी पोलीस हवालदार हरीश्चंद्र जानु पालवी यांच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पुष्पा आरणे करत आहेत.

ताज्या बातम्या