दिल्ली ।Delhi
मायक्रोसॉफ्टचा (Microsoft) वापर करणाऱ्या अनेक युजर्संच्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर एरर येऊ लागल आहे. गेल्या तासाभरापासून मायक्रोसॉफ्टची सेवा ठप्प (Microsoft Global Outage) पडली आहे.
यामुळे एअरलाइन्ससह बँकेच्या विविध कामांमध्ये अडथळा येताना दिसत आहे. तसेच विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर देखील परिणाम झाला आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
आकासा एअरलाइन्सने सांगितले की त्यांच्या काही ऑनलाइन सेवा मुंबई आणि दिल्ली विमानतळांवर तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध असतील. बुकिंग आणि चेक-इन सेवांसह आमच्या काही ऑनलाइन सेवा तात्पुरत्या अनुपलब्ध असतील.
स्पाईसजेटने सांगितले की, आम्हाला सध्या उड्डाण व्यत्ययांवर अपडेट प्रदान करण्यात तांत्रिक समस्या येत आहेत. हे सोडवण्यासाठी आमची टीम सक्रियपणे काम करत आहे. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि समस्येचे निराकरण झाल्यावर तुम्हाला कळवू.
एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या समस्येमुळे जागतिक स्तरावर अनेक विमान कंपन्या आणि विमानतळ प्रभावित झाले आहेत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि यावेळी तुमच्या संयमाची आणि समजूतदारपणाची प्रशंसा करतो.
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात निर्माण झालेली ही समस्या Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल केल्यामुळे झाली. ज्यामुळे स्टोरेज आणि कॅप्यूटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले. त्याचा परिणाम कनेक्टिव्हिटी फेलियरमध्ये झाला. आता ही अडचण तुम्हाली आली असणार तर ती दूर कशी करावी याची माहितीही मायक्रोसॉफ्टने दिली.
मायक्रोसॉफ्टने या तांत्रिक समस्येतून बाहेर येण्यासाठी काही स्टेप दिल्या आहेत. त्याचा वापर करुन ही समस्या दूर करता येणार आहे.
Windows सुरक्षित मोड किंवा Windows Recovery Environment मध्ये बूट करावे लागेल.
यानंतर त्यांना C:\Windows\System32\drivers\CrowdStrike डिरेक्टरीवर जावे लागेल.
यानंतर त्यांना C-00000291*.sys फाईल शोधावी लागेल आणि ती हटवावी लागेल.
शेवटी तुमचे संगणक रीस्टार्ट करावे लागेल.