Wednesday, July 24, 2024
Homeनगरजाळीवरून उडी मारून बिबट्याने शेळी केली ठार

जाळीवरून उडी मारून बिबट्याने शेळी केली ठार

कोल्हार | वार्ताहर

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील घोगरे वस्ती (सुभाष वाडी) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली.

शनिवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. १५-२० दिवसापूर्वी याच भागात बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन गमावण्याची वेळ एका शेतकऱ्यावर आली. त्यामुळे या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या; अधीक्षकांचे आदेश

कोल्हार खुर्द येथील घोगरे वस्ती येथे वास्तव्यास असलेल्या रोहित दत्तात्रय घोगरे यांच्या मालकीची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. त्यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये ३ – ४ शेळ्या, ४ गायी, १ कालवड बांधलेली होती. गोठ्याभोवती जाळी उभारलेली आहे. असे असतानादेखील सहा फूट उंचीच्या जाळीवरून उडी मारून बिबट्याने गोठ्यामध्ये प्रवेश केला.

Watermelon : लालेलाल-रवाळ कलिंगड कसं निवडाल? सोप्या टिप्स जाणून घ्या…

बिबट्याच्या भक्षस्थानी एक शेळी सापडली. हा प्रकार होत असतानाच जनावरांच्या हंबरण्याचा आवाज आल्याने घरातील सदस्य जागे झाले. त्यांनी घराबाहेर येऊन आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.

अभिनेत्री Tunisha Sharma च्या आत्महत्या प्रकरणात शिझान खानला जामीन मंजूर

रविवारी सकाळी राहुरी वन विभागाचे कर्मचारी पठाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याचा वाढता संचार लक्षात घेता या भागामध्ये पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली.

Accident : वाढदिवच्या सिलिब्रेशनला गेले ते परतलेच नाही; भीषण अपघातात ६ मित्रांचा जागीच मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या