Friday, June 21, 2024
Homeनगरयंदा वादळी वार्‍यासह पाऊस

यंदा वादळी वार्‍यासह पाऊस

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

- Advertisement -

यंदाच्या वर्षामध्ये सर्वत्र चक्रीवादळ व वादळी वार्‍यासह पाऊस पडून मोठ्या प्रमाणामध्ये हानी आणि नुकसान होणार आहे. याचा त्रास राजा व प्रजा या दोघांना होणार असल्याचे भाकित कर्जत येथे संत गोदड महाराज यांच्यासमोर व्यक्त करण्यात आले आहे.

कर्जत येथील संत सदगुरु गोदड महाराज यांनी साठ वर्षाची संवत्सरी लिहून ठेवली आहे. यामध्ये पिकपाणी त्याचप्रमाणे राजकारण, संकटे, नैसर्गिक आपत्ती याबाबत संपूर्ण जगाचे भाकित लिहून ठेवले आहे. याचे वाचन दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी मंदिरांमध्ये करण्यात येते. सुमारे दोनशे वर्षांपासून ही परंपरा आहे. गोदड महाराज मंदिराचे विश्वस्त पुजारी पंढरीनाथ महाराज काकडे यांनी या संवत्सरीचे वाचन आज केले. ते ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक आणि भाविक उपस्थित होते. सलग दोन वर्षे करोनामुळे भाविकांना हे भाकित मंदिरात येऊन ऐकता येत नव्हती. यावर्षी मात्र करोना निर्बंध उठवले. यामुळे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

प्रथम मंदिराचे प्रमुख मानकरी असलेले मेघनाथ पाटील यांनी नागेश्वर मंदिराच्या ठिकाणी पाऊस व धान्यांचे टाकलेले आढे काढूननंतर सवाद्य मिरवणुकीने त्यांना गोदड महाराज मंदिरापाशी आणण्यात आले आणि त्यानंतर संवत्सरीचे वाचन करण्यात आले. गोदड महाराज यांच्या या भाकित त्यामध्ये सांगितले आहे की, यावर्षी शुभ कृत संवत्सरी असून याचा स्वामी बूध आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडणार आहे. पिके देखील चांगली येणार आहेत. मात्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद या महिन्यांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये वादळ वारा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे.

खरीप व रब्बी पीक चांगले

यावर्षी पाऊस मान चांगले सांगितले असून मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार आहे. खरीप हंगामात पिके चांगली येणार असून सुरुवातीला पाऊस आहे. नंतर मात्र ओढ देण्यात आली आहे. मात्र सरासरी एवढा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी जास्त पावसाने नासाडी होण्याची शक्यता आहे. मुग, ऊस, गहू, भात ही पिके मुबलक येणार आहेत. या वर्षी पाऊस पडणार असून धान्य येणार आहे. मृग नक्षत्र चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या