Monday, June 24, 2024
Homeनगरगोदावरीच्या आवर्तनासाठी धरणातून विसर्ग

गोदावरीच्या आवर्तनासाठी धरणातून विसर्ग

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

गोदावरी (Godavari) कालव्यांच्या उन्हाळी सिंचन (Summer Irrigation) आणि बिगर सिंचनाचे आवर्तनासाठी सोमवारी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी खाली नांदूर मधमेश्वर (Nandur Madhameshwar) बंधार्‍यात दाखल झाल्यानंतर गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी 4 वाजता गंगापूर धरणातून 500, काल सकाळी 9 वाजता मुकणे धरणातून 550, वालदेवी धरणातून 250 असे 1300 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणातून (Darana Dam) 300 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे. हे एकुण 1600 क्युसेक्स पाणी नदीमार्गे दि. 8 मे 2024 पर्यंत नांदुर मधमेश्वर बंधार्‍यात पोहचेल.

धरण ते नांदूर मधमेश्वर बंधारा या दरम्यान पाणी पोहचण्यासाठी दोन दिवस लागतील. नांदूर मधमेश्वर बंधार्‍याची पाणी पातळी डेडस्टॉकमध्ये आहे. 27 फुट उंची आहे. बंधार्‍याची उंची 33 फुट येण्यासाठी 2 दिवस लागतील. बंधार्‍याची लेव्हल 10 मे 2024 पर्यंत आल्यावर 10 मे रोजी गोदावरीचा (Godavari) उजवा आणि डावा हे दोन्ही कालवे सुरु होतील. 25 दिवसाचे आवर्तन राहील. एकुण अपेक्षित पाणी वापर 3 टिएमसी आहे. बारमाही ऊस, फळबागांना पाणी देण्याचे नियोजन आहे. या हंगामातील हे शेवटचे आवर्तन आहे.

या आवर्तनात जलद कालव्याला पाणी देण्याचे नियोजन नसल्याचे समजते. दरम्यान तीव्र उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उभी पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. तर लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतींचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटून गेले आहेत. त्यामुळे राहाता (Rahata), कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील तसेच श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोंडेगाव परिसर या पाण्याची चातका सारखी वाट पाहात आहे. हे अवर्तन 10 मे ला सुटल्यानंतर ते 5 ते 6 जून पर्यंत चालेल. उन्हाळा हंगाम सन 2023-24 आवर्तन क्रमांक 2 करिता प्रवरा डावा कालव्यात सकाळी 6 वाजता शेतीसाठी विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पाणी नाशिक पुल (लोणी कोल्हार रस्ता पुलाजवळ) दुपारी 2.45 वाजता पाणी पोहचले.

- Advertisment -

ताज्या बातम्या