राहाता । तालुका प्रतिनिधी
नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या (Heavy Rain) प्रमाणात पाणी धरणांच्या मध्ये दाखल होत आहे.
आज सकाळी नऊ वाजता नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhemeshwar Dam) गोदावरीत 52308 क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदा पात्र (Godavari) दुथडी भरून वाहत आहे.
हे हि वाचा : जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गोदा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 9 वाजता 39002 क्यूसेक ने सुरु असलेला विसर्ग 13306 क्युसेकने वाढवून तो 52308 क्युसेक इतका करण्यात आला आहे.
आज सकाळी सहा वाजेपर्यंत गोदावरीतून 20 टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या (jayakwadi Dam) दिशेने करण्यात आलेला आहे. खाली जायकवाडीत उपयुक्त साठा 39.56 % इतका झाला आहे. म्हणजेच उपयुक्त साठा 30.33 टक्के इतका झाला आहे.
हे हि वाचा : सीनेला पूर, पावसाचे पाणी घरात घुसले
काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 115 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 58 मिमी, भावलीला 54 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 68 मिमी पावसाची नोंद झाली होती.