Saturday, July 27, 2024
Homeनगरगोदावरीतील विसर्ग 15114 क्युसेकवर

गोदावरीतील विसर्ग 15114 क्युसेकवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंदावला. अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या. त्यामुळे धरणातील विसर्ग घटविण्यात आले आहेत. काल गोदावरीतील विसर्ग घटवून तो 18269 क्युसेकवर आणण्यात आला. दारणातून 2650 क्युसेक तर गंगापूर मधून 1252 क्युसेकने विसर्ग सुरु होता.

- Advertisement -

गुरुवार व शुक्रवारच्या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक झाली. दारणात काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात 744 दलघफु नवीन पाणी दाखल झाले. दारणात 96.28 टक्के पाणीसाठा स्थिर ठेवून या धरणातून 2650 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणात काल सकाळी 6 वाजेपर्येंत मागील 24 तासात 530 दलघफु पाणी नव्याने दाखल झाले. या धरणातून काल सकाळी 6 वाजता 5432 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. पावसाचा वेग मंदावल्याने तो कमी कमी करण्यात आला. गंगापूर 95.08 टक्के साठा स्थिर ठेवून या धरणातून काल सायंकाळी 1252 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता.

कडवा धरणातून 3136 क्युसेक, आळंदीतून 210 क्युसेक, वालदेवीतून 193 क्युसेक, भावलीतून 382 क्युसेक, पालखेड मधून 418 क्युसेक असे विसर्ग सुरु आहेत. खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात हे पाणी दाखल होत आहे.

नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून काल सायंकाळी 18269 क्युसेकने विसर्ग सुरु होता. काल सकाळी या बंधार्‍यातून गोदावरीत 24579 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. तो कमी कमी करत 18269 क्युसेकवर स्थिर ठेवण्यात आला. काल सकाळी मागील 24 तासात 1 टिएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहुन गेले आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासातील पाऊस असा- पाऊस मिमी मध्ये- दारणा 82, मुकणे 39, वाकी 41, भाम 107, भावली 44, वालदेवी 75, गंगापूर 142, कश्यपी 76, गौतमी गोदावरी 98, कडवा 62, आळंदी 95, भोजापूर 25, पालखेड 57, नांदूरमधमेश्वर 39, नाशिक 109, इगतपूरी 93, त्र्यंबक 155, अंबोली 136, असा पाऊस नोंदला गेला.

गोदावरी कालव्यावरील पाऊस – मिमी मध्ये- देवगाव 32, ब्राम्हणगाव 30, कोपरगाव 25, पढेगाव 27, सोमठाणा 32, कोळगाव 3, सोनेवाडी 17, शिर्डी 12, राहाता 14, रांजणगाव 11, चितळी 15 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

धरणांचे साठे असे – दारणा 96.28 टक्के, मुकणे 84.46 टक्के, वाकी 71.55 टक्के, भाम 100 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 100 टक्के, गंगापूर 95.08 टक्के, कश्यपी 77.75 टक्के, गौतमी गोदावरी 75.64 टक्के, कडवा 90.58 टक्के, आळंदी 100 टक्के, भोजापूर 87.53 टक्के, पालखेड 81.52 टक्के असा पाणी साठा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या