Friday, May 3, 2024
Homeनगरगोगलगावमध्ये सुप्रिया विखेंचा सहा एकर ऊस जळाला

गोगलगावमध्ये सुप्रिया विखेंचा सहा एकर ऊस जळाला

लोणी |वार्ताहर| Rahata

राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुप्रिया यांचा सहा एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला.ऊस पिकासह ठिबक व पाईप लाईनचे लाखो रुपयांचे नुकसान आगीत झाले.

- Advertisement -

सोमवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास उसाला आग लागल्याचे लक्षात आले.दुपारची वेळ आणि उन्हाचा कडाका यामुळे आग वेगाने पसरली. पुढच्या आठ-दहा दिवसांत हा ऊस तुटून कारखान्याकडे गाळपासाठी जाणार होता.उसाच्या पिकासाठी ठिबक सिंचन केलेले असल्याने पीक उत्तम स्थितीत होते. विखे,तनपुरे आणि गणेश साखर कारखान्याच्या अग्निशामक गाड्या घतनास्थळी बोलावण्यात आल्या. अनेक तास आग विझवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले.मात्र सहा एकर ऊस,ठिबक संच आणि पाईप लाईन आगीत जळून गेले.लाखो रुपयांचे नुकसान या आगीत झाले.सुदैवाने या उसाच्या आजूबाजूच्या शेतातील पिकांचे नुकसान मात्र झाले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या