Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGold and Silver Rate : इराण आणि अमेरिका युद्ध थांबले अन् सोन्या-चांदीचे...

Gold and Silver Rate : इराण आणि अमेरिका युद्ध थांबले अन् सोन्या-चांदीचे भाव वाढले; दोन्ही किती हजारांनी वधारले?

शेअर बाजारातही उसळी

मुंबई | Mumbai

गेल्या ३८ दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्त्रायल (Iran and America-Israel) यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला दोन आठवड्यांसाठी विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुढील १४ दिवसांसाठी इराणवर हल्ले करणार नाही, असे म्हणत शस्त्रसंधीची घोषणा केली. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या अटीवर या शस्त्रसंधीला मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे युद्ध तात्पुरते थांबताच सोने (Gold price) आणि चांदीच्या (Silver price) दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याशिवाय भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली.

- Advertisement -

हे देखील वाचा : US Iran War : युद्ध थांबले! इराण-अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; ट्रम्प म्हणाले, “हो आम्ही नाही जिंकू…”

इराण-अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर आज (बुधवारी) सकाळी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. आज सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांनी वाढून ०१ लाख ५१ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात १० हजार रुपयांची वाढ झाल्याने चांदीचा भाव ०२ लाख ४७ हजारांवर जाऊन पोहोचला आहे.
दरम्यान इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युद्ध (War) समाप्तीच्या दिशेने वाटचाल करु लागल्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.

शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स २५०० अंकांनी वधारला

इराण-अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधी जाहीर होताच जगभरातील शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. आज (बुधवारी) सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या रेघा हिरव्या रंगात न्हाऊन निघाल्या असून, दोन्ही निर्देशांक जवळपास ३.५ टक्क्यांनी धावला. सेन्सेक्सने तब्बल २७०० हून अधिक अंकांची ऐतिहासिक झेप घेतल्याने अवघ्या काही मिनिटात गुंतवणूकदारांनी जवळपास १४ लाख कोटी रुपये छापले.तर निफ्टी ७५० अंकांनी वधारला आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या भावात देखील मोठी घसरण झाली असून, १३ टक्क्यांनी दर पडले आहेत. कच्च्या तेलाचे भाव ९५ डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. याशिवाय आयटी, मेटल, रिअॅल्टी क्षेत्रातील समभागात मोठी तेजी दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना ‘एस. एस....

0
नाशिक, दि. ११ सप्टेंबर २०२६ : जिमाका वृत्तसेवा Nashik सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक...