Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik News : महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; सोन्याचे मंगळसूत्र केले परत

Nashik News : महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; सोन्याचे मंगळसूत्र केले परत

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी (Women Sanitation) हे साफसफाईचे काम करतात. पंचवटीतील (Panchvati) एका स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा हा दिसून आला आहे. मंगळवार (दि.२३) रोजी तपोवन कॉर्नर येथील जी टी टायर्स येथे महिला स्वच्छता कर्मचाऱ्याला तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र (Mangalsutra) सापडले, त्यांनी ते पंचवटी पोलिस ठाणे गाठले अन् पोलिसंच्या स्वाधीन केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना पोलिसानी पुष्पगुच्छ व शाल देऊन तर महानगरपालिकेतर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

हे देखील वाचा : देवळाली मतदारसंघावर भगवा फडकवा; शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकरांचे आवाहन

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार दि. २१ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास चित्रा महेश वडनेरे, (४०, रा. ओम अपार्टमेंट फ्लॅट नंबर १२, कृष्ण नगर पंचवटी नाशिक ) या आपल्या पतीसोबत जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर ल्या होत्या. शतपावली करत नवजीवन हॉस्पिटल समोर असलेल्या जे. के. टायर्स तपोवन कॉर्नर, कृष्णनगर येथून जात असताना अचानक पाठीमागून काळ्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा संशयितांनी चित्रा यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन (Gold Chain) खेचून मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव नाक्याच्या दिशेने पोबारा केला.

हे देखील वाचा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

या घटनेची माहिती घाबरलेल्या वडनेरे दांपत्याने तात्काळ पोलिसांना (Police) कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात आजूबाजूला या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हाती कुठलेच धागेदोरे लागले नाही. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास पोलिस करीत होते, मंगळवार (दि.२३) रोजी तपोवन कॉर्नर येथील जी टी टायर्स येथे महीला स्वच्छता कर्मचारी अर्चना सचिन गांगुर्डे ह्या तपोवन कॉर्नर येथील जी टी टायर्स जवळ स्वच्छता, साफ सफाई करत असताना त्यांना तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र हे सापडले,  त्यांनी ते पंचवटी पोलिस ठाण्यात जाऊन जमा केले.

हे देखील वाचा : Nashik Bribe News : दीड लाखांची लाच मागितल्याप्रकरणी एटीएसचा पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात

अर्चना सचिन गांगुर्डे त्यांच्या या प्रामाणिक व कर्तव्य दक्षतेबाबत गुरुवार (दि.२५) रोजी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड व पोलिस निरीक्षक प्रशासन सुशील जुमडे, पोलिस निरीक्षक ज्योती आमने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ आवेश पलोड, पंचवटी विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक राकेश साबळे, दीपक चव्हाण यांचे तर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.  यावेळी ज्यांची सोन्याची मंगळसूत्र सापडले त्या चित्रा महेश वडनेरे देखील उपस्थित होत्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या