Sunday, August 30, 2026
Homeक्रीडाNeeraj Chopra: ‘गोल्डन बॉय’ला दुखापतीचा फटका; नीरज चोप्रा आशियाई गेम्समधून OUT, २०२६चा...

Neeraj Chopra: ‘गोल्डन बॉय’ला दुखापतीचा फटका; नीरज चोप्रा आशियाई गेम्समधून OUT, २०२६चा हंगामही संपला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय क्रीडाप्रेमींसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही. प्रशिक्षणादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाल्याने त्याने उर्वरित संपूर्ण हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसोबतच डायमंड लीग फायनलमध्येही नीरज खेळताना दिसणार नाही.

- Advertisement -

नीरज चोप्राने हा निर्णय या हंगामातील बेस्ट थ्रो फेकल्यानंतर निर्णय जाहीर केला. २१ ऑगस्टला लॉजेन डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 88.05 मीटरचा थ्रो केला होता. नीरज चोप्राने लॉजेन डायमंड लीगमधून बाहेर झाल्याची माहिती दिली. नीरज चोप्राच्या पोस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडल्याचा उल्लेख नाही. मात्र, पूर्ण हंगामातून बाहेर केल्याचे नीरज चोप्राने सांगितले म्हणजेच तो आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

लॉझेन डायमंड लीगमध्ये नीरजने या वर्षातील तिसऱ्या स्पर्धेत मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, २९ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे त्याने हंगाम संपवत असल्याचे स्पष्ट केले.”दुर्दैवाने, सरावादरम्यान माझ्या घोट्याचे लिगामेंट टियर (स्नायू फाटणे) झाले. डॉक्टर आणि माझ्या टीमसोबत चर्चा केल्यानंतर, मी या मोसमातील उर्वरित स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे नीरजने नमूद केले.

नीरज चोप्रा म्हणाल की, दुखापत होणं हे निराशाजनक आहे, कारण मला वाटतं की मी लय मिळण्याच्या जवळ होतो. मात्र, जसं म्हटलं जात की अडथळे प्रवासाचा भाग असतात. माझं लक्ष आता पूर्णपणे बरं होण्यावर आणि ताकदीनं पुनरागमन करण्यावर असेल, असं चोप्रानं म्हटलं.

पुनरागमन करताना नीरजची कामगिरी संमिश्र राहिली. ग्लासगोमध्ये त्याने पदक निश्चित केले असले तरी श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने ८९.७५ मीटरचा लांब फेक करत सुवर्णपदक पटकावले. लॉझेनमधील स्पर्धा ही आशियाई खेळांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जात होती, मात्र हीच त्याची २०२६ मधील शेवटची स्पर्धा ठरली.या दुखापतीमुळे डायमंड लीग फायनल खेळण्याच्या त्याच्या आशांवरही पाणी फेरले गेले आहे. गुणतालिकेत सातव्या स्थानावर असलेला नीरज अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम होता.

जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजच्या अनुपस्थितीमुळे भारताला मोठा फटका बसला आहे. आपल्या जेतेपदाचा बचाव करण्याची संधी आता त्याच्या हातातून निसटली आहे. नीरजच्या माघारीनंतर आता सर्वांच्या नजरा रोहित यादववर खिळल्या आहेत. रोहितने नुकताच भुवनेश्वर येथील ‘वर्ल्ड ॲथलेटिक्स सिल्व्हर लेव्हल कंटिनेंटल टूर’मध्ये ८७.६८ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाकरी फिरवली, १० नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर, कोणाचा आहे समावेश?

2023 मध्ये आशियाई स्पर्धांमध्ये नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकलं होतं. चीनच्या हांगझोऊमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्रानं 88.88 मीटरचा थ्रो केला होता. त्यावेळी भारताच्या किशोर जेना यानं रजत पदक मिळवलं होतं.

नीरज चोप्रानं गेल्या दोन्ही आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं.आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेआधी भारताला मोठा धक्का बसलाय.

ताज्या बातम्या

उझबेकिस्तानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च सन्मान; ‘ओलिय दराजाली दोस्तलिक’ पुरस्काराने गौरव

0
दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय उझबेकिस्तान दौऱ्यादरम्यान भारत-उझबेकिस्तान संबंधांना नवे बळ मिळाले. आज उझबेकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...