Saturday, August 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाकरी फिरवली, १० नव्या प्रवक्त्यांची...

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाकरी फिरवली, १० नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर, कोणाचा आहे समावेश?

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पक्षाच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली आहे. पक्षाकडून १० प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडण्यासाठी नव्या टीमची निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्ष संघटना आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री अनिलजी देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे, माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार उपस्थित होते.

नव्या प्रवक्त्यांच्या यादीत जितेंद्र आव्हाड, अनिश गवांदे यांच्यासह पक्षातील विविध नेत्यांना संधी देण्यात आली आहे. नव्या टीममध्ये अनुभवी नेत्यांसोबतच पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणाऱ्या युवा चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Rahul Gandhi:पंतप्रधानांनी स्वतः याचे आदेश द्यावेत, नाही तर…; मल्लिकार्जून खरर्गेंच्या भाषणानंतर शुद्धिकरणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा इशारा

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गेल्या काही काळात संघटनात्मक पातळीवर बदल केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी पक्षाने प्रवक्त्यांच्या जुन्या पॅनेलमध्ये मोठे फेरबदल करत पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. त्यावेळी विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्याकडे अधिकृत प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

आता नव्याने १० प्रवक्त्यांची यादी जाहीर झाल्याने पक्षाच्या माध्यम आणि राजकीय संवाद यंत्रणेला पुन्हा विस्तार देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

आगामी राजकीय संघर्षासाठी नवी टीम?
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या अत्यंत तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष, आगामी निवडणुका आणि विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात सुरू असलेली टीका या पार्श्वभूमीवर प्रवक्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

. श्री जितेंद्र आव्हाड
2. श्री.क्लाईड क्रास्टो
3. श्री. भीमराव हत्तीअंबीरे
4. श्री. अनिश गवांदे
5. ॲड. फैजल मिर्झा
6. श्री.महेबूब इब्राहीम शेख
7. श्री. प्रवीण कुंटे पाटील
8. श्री.प्रशांत सोनबा वीरकर
9 . ॲड. हेमाताई पिंपळे
10. डॉ. चंद्रकांत बारेला

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अल्पवयीन ड्रायव्हिंग; वडिलांवर गुन्हा, पंधरा वर्षांच्या मुलाला...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या (Deolali Camp Police Station) हद्दीत १५ वर्षांच्या मुलाला चारचाकी (कार) चालवण्यास देणे वडिलांच्या चांगलेच अंगलट आले...