Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराष्ट्रीय खेळाडू व गोल्फ प्रशिक्षक इंद्रजीत बलोटिया यांची कुंदेवाडी गोल्फ मैदानास भेट...

राष्ट्रीय खेळाडू व गोल्फ प्रशिक्षक इंद्रजीत बलोटिया यांची कुंदेवाडी गोल्फ मैदानास भेट व खेळाडूंशी संवाद

निफाड | प्रतिनिधी Niphad

- Advertisement -

राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक इंद्रजीत बलोटिया यांनी गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता निफाड शहरातील कुंदेवाडी शिवारातील राष्ट्रीय गोल्फ मैदानास भेट देत खेळाडूंची संवाद साधला

YouTube video player

या शहरी खेळाला ग्रामीण भागात आणण्यासाठी गोल्फ खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारे निफाड येथील भूमिपुत्र तथा सेवानिवृत्त एअरफोर्स विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी राष्ट्रीय प्रशिक्षकाला ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी व खेळाचा प्रसार प्रचार होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दैनिक ‘देशदूत’ वृत्तपत्राच्या वतीने प्रशिक्षक इंद्रजीत बलोटिया यांची प्रत्यक्ष मैदानावर मुलाखत घेऊन या खेळाविषयी त्यांचे मत जाणून घेतले. बोलोटिया यांनी मनमोकळ्या गप्पा मारत देशदूतच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन या खेळाविषयी शासन, प्रशासन व शिक्षण संस्था कमी पडत असल्याने जनजागृती करण्याचे आव्हान प्रसारमाध्यमांना केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

प्रश्न : गोल्फ क्रीडा प्रकार भारतात पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी का झाला नाही?
इंद्रजीत बलोटिया: देशभरात 700 ते 800 गोल्फ मैदान व यांना पुरस्कृत करणाऱ्या संस्था आहे. यात 50 टक्के आर्मी अर्थात सैन्यदल, एअरफोर्स व नेव्ही यांच्या गोल्फ मैदाने आहे. तर 25% खाजगी व्यक्तींची गोल्ड मैदानी आहे. त्यामुळे इच्छा असूनही काही उभरत्या युवा खेळाडूंना व या खेळा विषयी आकर्षण असलेल्या मुलांना या खेळाचे ज्ञान व प्रशिक्षण मिळत नाही.

प्रश्न: सर्वसामान्य घरातील गोल्फ खेळाडू घडवण्यासाठी कोठे मैदाने व प्रशिक्षण केंद्र आहेत.
इंद्रजीत बलोटिया: भारतात दिल्ली व नोएडा येथेच प्रशिक्षण व गोल्फ मैदाने सध्यातरी येथेच उपलब्ध आहे. व आता तुमच्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून निफाड तालुक्यात विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी हे मोठे शिवधनुष्य गोल्फ खेळाडू तयार करण्यासाठी उचलले आहे. यासाठी त्यांना शासन प्रशासन व शिक्षण संस्थांनी मदत केली. तर भविष्यात निश्चितच येथून राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होऊ शकतील.

प्रश्न – क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, कबड्डी, या खेळां सारखा गोल्फ खेळ का यशस्वी झाला नाही. त्याला पाहिजे तशी प्रसारमाध्यमांनी किंवा शासनाने मदत केली नाही.
इंद्रजीत बलोटिया: गोल्फ हा खेळ जास्त मोठ्या मैदानाचा आहे.गोल्फ खेळासाठी कमीत कमी 25 एकर जमीन अर्थात मैदान व जास्तीत जास्त जेवढे असेल तेवढी कमीच पडते. आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यात आपली लोकसंख्या व जमिनीचे होणारे तुकडे लक्षात घेता. शासनाला हा खेळ व्यावहारिक वाटत नसल्याने किंवा प्रशासन व शिक्षण संस्था यांनी या खेळासाठी खेळाडू तयार करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात कष्ट घेतले नाही. हा खेळ साहेबी खेळ म्हणून देशात व ग्रामीण भागात हिनवला गेला. त्यामुळे या खेळाचा प्रचार प्रसार झाला नाही. परंतु हा खेळ नसून एक इंडस्ट्री आहे. या खेळाच्या माध्यमातून मोठे अर्थकारण निर्माण होऊन रोजगार निर्मिती होते.

प्रश्न – या खेळाला भविष्यात क्रिकेट प्रमाणे आणण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय प्रशिक्षक व खेळाडू म्हणून काय संदेश देणार.
इंद्रजीत बलोटिया: क्रिकेट प्रमाणे या खेळाला दिवस व या खेळाकडे आकृष्ट होण्यासाठी या खेळाची व्यापारीकरण होणे गरजेचे आहे. जसे बीबीसीआय आयसीआय या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्थांनी या खेळाचे व्यावसायिकरण करून प्रयोजक, जाहिरातदार ,लीग स्पर्धा या माध्यमातून खेळाडूंनाही अर्थकारण प्राप्त करून दिले. या संस्थाही अर्थकारणातून मोठ्या झाल्या. त्याचप्रमाणे गोल्फ खेळाला आयसीआय व बीबीसीआय प्रमाणे नेतृत्व मिळाले तर हा खेळही भारतात प्रसिद्ध होऊन या खेळाच्या माध्यमातून मोठी क्रांती होऊ शकते.

प्रश्न : या खेळात मध्यमवर्गीय कुटुंबातील खेळाडू का घडले नाही किंवा घडवले जात नाही.
इंद्रजीत बलोटिया: हा प्रश्न अत्यंत चांगला आहे. या खेळात एक तर एकदम उच्च अर्थात ज्यांचे अर्थकारण मजबूत आहे. त्याच घरातील व आई-वडिलांची मुले खेळाडू यशस्वी झाले. किंवा जे एकदम तळागाळातील खेळाडू आहे. ज्यांना यातून आपल्याला काहीतरी अर्थकारण मिळू शकेल व आपण या खेळाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधू असेच खेळाडू यशस्वी झाले. पण या खेळात मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले यशस्वी होऊ शकले नाही .कारण की त्यांनी याकडे करिअर म्हणून त्यांनी बघितले नाही. त्यामुळे या खेळाकडे मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले अजूनही या खेळा बाबत अनभिज्ञ आहे.

प्रश्न :हा खेळ खर्चिक आहे असे बोलले जाते
इंद्रजीत बोलोटिया: हो बरोबर आहे हा खेळ हा गोल खेळ खर्चिक आहे परंतु देशभरात असा कोणता खेळ आहे की तो खर्चिक नाही कबड्डी असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराची देखभाल करण्यासाठी विविध प्रकारचे कबड्डी असो कुस्ती असो तुम्हाला तुमचे शरीर संपदा राखण्यासाठी खुराक घ्यावा लागतो प्रशिक्षक ठेवा लागतो क्रिकेट असो क्रिकेटची सर्व संसाधने किती महाग आहेत हॉकी असेल तसाच गोल खेळासाठी जवळपास 14 बॅट तुम्हाला घ्याव्या लागतात तसेच प्रशिक्षक ठेवावा लागतो गोल जिमखाना असो की मैदान यासाठी तुम्हाला सभासद व्हावे लागते त्यामुळे गोल प्ले खर्चिक खेळ म्हणून न बघता सगळेच खेळही खर्चिक आहे त्यासाठी तुमची मेहनत कष्ट करण्याची तयारी असेल तर यावर तुम्हाला प्रायोजक मिळू शकतो यासाठी तुमच्या टॅलेंट असणे गरजेचे आहे याचे उदाहरण कुस्ती दारासिंग, खाशाबा जाधव, सचिन तेंडुलकर क्रिकेट मध्ये, हॉकी धनराज पिल्ले, बुद्धिबळात विश्वनाथ आनंद, टेनिस लिएंडर पेस महेश भूपती, बॅडमिंटन सायना नेहवाल, असे विविध उदाहरणे तुम्हाला सांगता येईल यासाठी त्या खेळाडूची त्या खेळाकडे बघण्याची मानसिकता एकाग्रता व त्या खेळावर असणारे प्रेम यातूनच तो खेळाडू ,राज्यासाठी देशासाठी तयार होत असतो.

प्रश्न: शासन व प्रशासना बाबत गोल्फ खेळाविषयी तुम्ही काय सांगाल?
इंद्रजीत बलोटिया: देशात व प्रत्येक राज्यात त्या खात्याचा क्रीडामंत्री हा एखादा खेळाडू असला पाहिजे तरच दीडशे कोटीच्या या देशात खेळाडूंना वाव मिळू शकतो तसेच प्रशासन व शासनाची तयारी निधी देऊन तो खरंच त्या खेळासाठी वापरला जातो की नाही वापरला जात असेल तर त्यातून त्या निधी खर्च झालेल्या निधीतून काय मिळाले याचही याच्यावरही बारीक लक्ष असले पाहिजे तरच दीडशे कोटीच्या या देशात टॅलेंट व खेळात प्राविण्य मिळवण्याची क्षमता असूनही ते बाजूला पडले आहे त्यासाठी शासनाची मानसिकता व देशातील सर्व शिक्षण संस्था प्रायव्हट असो या सरकारी यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे यासाठी मी प्रसार माध्यमांन प्रसारमाध्यमांना आवाहन करेल गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसार माध्यमांच्य माध्यमातून शिक्षण संस्था प्रशासन व शासनात जागृती आणण्याचे काम तुम्ही केले पाहिजे तरच उद्याच्या देशात तिसरी अर्थ व्यवस्था होत असलेल्या तर लोकसंख्येच्या बाबतीत एक नंबर वर गेलेल्या भारतात खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसणार आहे.

प्रश्न:आपल्या देशात सर्वाधिक खेळाला प्रोत्साहन देणारे कोणते राज्य आहे?
इंद्रजीत बलोटिया : भारत देश भाषा जाती संस्कृती रीती रिवाज परंपरा यात विविधतेने नटलेला देश आहे परंतु खेळाच्या माध्यमातून भारतात एकसंघ असल्याची भावना तयार होत असते त्यामुळेच कुठलाही खेळ असो तो सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन नागरिकांना एकसंघ बांधण्याची प्रेरणा देतो केरळ पश्चिम बंगाल येथे फुटबॉल ला खूप मागणी आहे व या खेळाकडे सर्वच स्तरातून खेळाडू तयार होत असतात पश्चिम बंगालला ज्यावेळेस फुटबॉलची मॅच असते तेव्हा देशभरातून 40 ते 50 हजार फुटबॉल प्रेमी येथे मॅच बघण्यासाठी येत असतात पश्चिम बंगालमधील विविध फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय मानांकनाथ शंभराव्या स्थानावर आहे. ओरिसा येथील विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे हॉकी खेळाला खूप प्रोत्साहन देऊन खेळाडूंच्या पाठीमागे आर्थिक व प्रशिक्षीत पाठबळ गत अनेक वर्षापासून निर्माण करत आहे. असेच सर्व राज्यातील राज्य शासनांनी केले पाहिजे.

विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी गोल्फ खेळासाठी कुठलीही पार्श्वभूमी नसलेला प्रशांत झोमान या विकलांग असलेल्या खेळाडूला तयार करून कुठलाही मोबदला न घेता गत तीन ते चार वर्षापासून त्याला प्रशिक्षण देत आहे. एका हाताने अधू असलेला प्रशांत झोमान कुंदेवाडी येथील गोल्फ मैदानावर दररोज सरावासाठी येऊन आपल्यातील गोल्फ खेळाडू घडवत आहे. बागमार यांनी 2018 पासून 2000 पेक्षा युवा खेळाडूंना मार्गदर्शन करून गोल्फ खेळ ग्रामीण भागात रुजवण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. त्याचे मूर्तीमंत उदाहरण प्रशांत झोमाण च्या माध्यमातून एका साखर कामगाराचा मुलाला त्यांनी या खेळात आणून आपली या खेळाविषयी आत्मीयता सिद्ध केली आहे.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...