श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील गोंधवणी (Gondhavani) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या पथकांने गावठी हातभट्टी दारू (Hand Furnace Alcohol) अड्डयावर छापा (Police Raid) टाकत एक लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला असून या प्रकरणी पाच जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल मुकुंदा फुलारे, अर्जुन दौलत फुलारे, संदीप सुरेश शिंदे, अशोक सिताराम गायकवाड, ऋतिक शिवाजी गायकवाड सर्व राहणार गोंधवणी (Gondhavani) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे (DYSP Dr. Basavaraj Shivpunje) यांना गुप्त बातमीदार मार्फत गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जावून छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा (Police Raid) टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट केली असून आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अनुषंगाने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गोंधवणी परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाईचे गोंधवणी येथील महिलांनी डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्यासह त्यांच्या पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहे. सदरची कारवाई डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे, सुरेश औटी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री गोरे, पोलीस कॉन्स्टेबल अर्चना अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल आरती जाधव यांच्यासह आरसीपी पथक यांनी केली आहे.