भंडारा | Bhandara
गोंदिया-बालाघाट मार्गावर नागरा-मोहरानटोली परिसरात ट्रक आणि प्रवासी पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातातील सगळेजण छत्तीगढचे मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे.
लाखनी तालुक्यातील साकोली लाखनी राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगावजवळील भाऊ ढाब्याच्या परिसरात आज पहाटे हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गालगतच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून एक ट्रक नागपूरच्या दिशेने निघाला होता. हा ट्रक महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ८ मजूरांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पिकअप वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. क्रेन आणि गॅस कटरच्या मदतीने वाहनातून जखमी तसेच मृतांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?
घटनेची माहिती मिळताच नॅशनल हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत मजूर हे छत्तीसगढचे असल्याची माहिती मिळाली असून ते कामानिमित्त नागपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्गावरील या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.




