Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजShivshahi Bus Accident: गोंदियात शिवशाही बस उलटून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू,...

Shivshahi Bus Accident: गोंदियात शिवशाही बस उलटून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया | Gondia
गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ७ ते ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात झाला. तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ आज दुपारी १ च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असतानना शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात इतका भीषण होता की बसमधून काही प्रवासी बाहेर फेकले गेले.

- Advertisement -

या अपघातामध्ये ७ ते ८ जणांचा मृत्यू झालाय. अनेक प्रवासी जखमी असल्याची माहिती माहिती मिळाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. काही जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील मृताचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत.

दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...