नाशिक रोड | प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात बांगलादेशात झालेल्या दंगलीत हिंदू समाजातील नागरिकांवर व कुटुंबावर वर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले त्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंद पुकारण्यात आला असून या बंदला नाशिक रोड परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या आठवड्यात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात या दंगलीमध्ये तेथील हिंदू व अल्पसंख्यांक समाजावर हल्ले करण्यात येऊन त्यांना पळवून लावण्यात आले. त्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा हिंदू सकल समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंद पुकारण्यात आला असून आज सकाळपासूनच या बंदचा परिणाम नाशिक रोड परिसरात जाणवू लागला. परिसरातील सुभाष रोड, देवळाली गाव स्टेशन रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, छत्रपती शिवाजी पुतळा चौक परिसर, बिटको चौक मुक्तिधाम परिसर, जेलरोड, सिन्नर फाटा या भागात असलेल्या दुकाने बंद होते, तर काही ठिकाणचे जे दुकाने उघडे होते त्यांना हिंदू सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करावयास लावली.
हिंदू सकल समाजाचे कार्यकर्ते दुचाकी गाडीवर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. त्यांच्या या आव्हानाला दुकानदारांनी प्रतिसाद देऊन दुकाने बंद केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, यांचे मार्गदर्शनाखाली परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा