Thursday, June 20, 2024
Homeजळगावभडगाव येथील शेतकऱ्याचा गोपीनाथ मुंडे अपघात विमा मंजूर

भडगाव येथील शेतकऱ्याचा गोपीनाथ मुंडे अपघात विमा मंजूर

भडगाव प्रतिनिधी – Bhadgaon

- Advertisement -

भडगाव शहरातील महादेव गल्ली येथील शेतकरी योगेश किसन तिवारी यांचा दि.१३ मार्च २०२० रोजी संर्पदंशाने मृत्यू झाला होता.

मृत्यू पश्चात गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा प्रस्ताव कृषी विभाग भडगाव येथे तत्कालीन आत्मा कमिटीचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील यांनी दाखल केला होता. तो मंजूर होऊन मयताचे वारस पत्नी श्रीमती भारती योगेश तिवरी यांच्या बॅक खात्यावर २ लाख रूपये एनएफटी झाले असुन तसे मंजूरी पत्र आज भडगाव तालुका कृषी अधिकारी बी बी गोरडे यांनी तालुका कृषी कार्यालयात दिले. यावेळी सोमनाथ पाटील, जिभू चौधरी व नितीन दुबे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या