Tuesday, March 25, 2025
Homeनगरसंचमान्यतेचा सुधारित शासन निर्णय शिक्षकांच्या मुळावर

संचमान्यतेचा सुधारित शासन निर्णय शिक्षकांच्या मुळावर

गुरूजी अतिरिक्त ठरण्याची भीती || बदली पात्र प्राथमिक शिक्षकांचा डाटा अपडेट

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शालेय शिक्षण विभागाने मार्च 2024 मध्ये संचमान्यतेबाबत काढलेले सुधारित आदेश व शाळांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या मुळावर आहे. यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी आवश्यक माहिती, बदली पात्र शिक्षकांचा डाटा जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्याच्या ऑनलाईन पोर्टलवर फीड केला आहे. लवकरच बदली पात्र शिक्षकांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी संधी मिळणार आहे. त्यानंतर शिक्षकांच्या बदल्याचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

- Advertisement -

दरवर्षी उन्हाळ्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना बदल्याचे वेध लागतात. यंदा मात्र, बदल्यासोबत राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी संचमान्यतेच्या 2024 च्या सुधारित आदेशाचा धसका घेतला आहे. पूर्वीच्या पटापेक्षा आता सुधारित आदेशात जादा पटावर शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्यात आली असल्याने यंदा नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यात पूर्वी 20 विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकांची पदे मंजूर होती. त्यात बदला नसला तरी तिसेर पद मंजूरीसाठी 61 ऐवजी 76 विद्यार्थी संख्या शिक्षकांना ठेवावी लागणार आहे. अन्यथा तिसरे पद हे मंजूर होणार नाही. तसेच चार शिक्षकांच्या पदासाठी 91 ऐवजी 106 विद्यार्थी पट करण्यात आला आहे. तसेच पाच पदासाठी 121 ऐवजी 136, सहा पदासाठी 151 पटाऐवजी 166 विद्यार्थी संख्या करण्यात आली आहे. यामुळे प्राथमिक शाळामधील शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहेत. या महत्वाचे म्हणजे आता 35 विद्यार्थी पटावर एक शिक्षक राहणार आहे. मुख्याध्यापक पदासाठी विद्यार्थ्यांची पट संख्याने 15 ने वाढवण्यात आलेली आहे.

माध्यमिक शाळामध्ये देखील दोन शिक्षकांच्या पदासाठी 31 वरून पट संख्या ही 46, तीन पदासाठी ही पटसंख्या 61 वरून 76, चार पदासाठी 91 वरून 106, पाच पदासाठी 121 वरून 136 करण्यात आली आहे. यात विशेष करून 210 विद्यार्थ्यांच्या संख्येपर्यंत आरटीई निकषानूसार प्रती 30 विद्यार्थ्यांच्या मागे 1 मंजूर राहणार आहे. विशेष शिक्षक माध्यमिक शाळामध्ये 251 ते 500 विद्यार्थ्यांच्या पटावर एक शिक्षक पद, 501 ते 750 तीन पद यासह विद्यार्थ्यांच्या पटाच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.

या सुधारित संचमान्यतेला शिक्षक संघटनांचा विरोध असून शासन पातळीवर चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसतांना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी 2023 मध्ये बदली झालेल्या शिक्षकांची माहिती अद्यावत करण्यात आली आहे. यात आंतरजिल्हा बदलीने कमी झालेल्या जागा, सेवानिवृत्त आणि पवित्र पोर्टलनूसार निर्माण झालेल्या जागा याची माहिती बदली प्रक्रियेच्या ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करण्यात आली आहे. यासाठी 28 फेबु्रवारी ही शेवटची मुदत होती. आता राज्यातील सर्व जिल्ह्यातील ही माहिती संकलित झाल्यावर शिक्षकांना त्यांना स्वत:ची प्रोफाईल अद्यावत करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

प्राथमिकचे 500 अतिरिक्त शिक्षक होण्याची भीती
अहिल्यानगर जिल्ह्यात 11 हजार प्राथमिक शिक्षकांची पदे मंजूर असन संचमान्यतेचा 2024 चा शासन निर्णय आणि शाळांच्या संरचनेत बदल झाल्यास नगर जिल्ह्यात एकट्या प्राथमिक शिक्षकांच्या 400 ते 500 जागा अतिरिक्त ठरण्याची भिती व्यक्त होत आहे. यामुळे शिक्षक संघटना पातळीवरून या सुधारित संचमान्यता आदेशाला विरोध होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...