Saturday, January 24, 2026
Homeक्राईमPathardi : सरकारी कर्मचार्‍याकडून ठेकेदाराला मारहाण, धमकी

Pathardi : सरकारी कर्मचार्‍याकडून ठेकेदाराला मारहाण, धमकी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी शहरातील मणिकदौंडी चौकात मंगळवारी मध्यरात्री सरकारी ठेकेदार अजिंक्यराजे गर्जे (रा. पाथर्डी) यांना सार्वजनिक बांधकाम विभागातील सरकारी कर्मचारी श्रीकांत पालवे (रा. धामणगाव देवी रोड, पाथर्डी) आणि प्रतीक बढे (रा. नाथनगर, पाथर्डी) यांनी टक्केवारीसाठी मारहाण आणि धमकी दिली.

- Advertisement -

याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी रात्री श्रीकांतने दारूच्या नशेत अजिंक्यराजे यांना फोन करून टक्केवारी मागितली आणि माणिकदौंडी चौकात बोलावले. तिथे श्रीकांत आणि प्रतीक यांनी गाडीतून उतरून गर्जे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण केली. त्यांच्या पाठीवर, डोक्यावर, तोंडावर आणि हातावर जखमा झाल्या.

YouTube video player

यात त्यांची दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी गहाळ झाली. दोघांनी पुन्हा नादी लागलास तर जीवे मारू अशी धमकी देऊन पळ काढला. गर्जे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...