कोची | Kochi
केरळमधील कोची (Kochi) मधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे एक कार पेरियार नदीत पडली. या अपघातात (Acciden) कारमधून प्रवास करणाऱ्या दोन डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत डॉक्टर अद्वैत आणि अजमल हे दोघेही खासगी रुग्णालयात डॉक्टर होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी डॉ.अद्वैत कार चालवत होते. रस्ता माहित नसल्याने त्यांनी GPS चालू केला होता. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शनिवारी गोथुरुथमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हवामान खराब होते आणि दृश्यमानता खूपच कमी होती. यामुळेच कारमधील प्रवाशांनी योग्य मार्गासाठी गुगल मॅपची मदत घेतली. त्यानंतर त्यांनी कार डाव्या बाजूने घेतली. मात्र चुकीमुळे ते थोडे पुढे गेले आणि त्यांची गाडी नदीत पडली.
VIDEO : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे शेतात इमर्जन्सी लँडिंग
अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी कार नदीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघातात जखमी झालेले डॉ. गजिक थाबसीर यांनी सांगितले की, आम्ही जीपीएसच्या मदतीने पुढे जात होतो. जीपीएसने चुकीची दिशा दिल्याने गाडीचा तोल गेल्याने हा अपघात झाला. याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
मनेका गांधींना ‘ते’ वक्तव्यं भोवल; ISKCON ने पाठवली 100 कोटींची मानहानीची नोटीस