नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon
नांदगाव तालुक्यातील ( Nandgaon Taluka ) मुदत संपलेल्या पाच ग्रामपंचतींसाठी ७८.७९ टक्के मतदान झाले. फुलेनगर, क्रांतीनगर, गिरणानागर, मल्हारवाडी, हिंगणवाडी या पाच ग्रामपंचायतीच्या ५९ सदस्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
सकाळी ७:३० ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.एकूण ४६९१ मतदार संख्येपैकी ३६९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगणवाडी येथील बुथ क्रमांक तीनवर सर्वाधिक ७८.९१ टक्के मतदान झाले येथे २६६ पैकी २३८ मतदारांनी मतदान केले.
सर्वात कमी मतदान गिरणानागर येथील बुथ क्रमांक तीनवर ४१.९८ टक्के मतदान झाले. येथील ४७४ मतदारांपैकी १९९ मतदारांनी मतदान केले. किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. काही गावात चुरशीची लढत झाल्याचे चित्र होते.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता येथील प्रशासकीय संकुलात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी साठी पाच टेबल ठेवण्यात येणार आहे. पाच फेऱ्यात मतमोजणी पूर्ण होईल. मतमोजणीसाठी दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदगाव तालुक्यातील हिंगणवाडी ग्रामपंचायतीच्या ( Hinganwadi Grampanchayat)निवणुकीसाठी झालेल्या मतदानात आज 110 वर्षांच्या आजी गजाबाई काळू आयनोर ( Gajabai Kalu Aaynor )यांनी मतदानाचा हक्क बजावला.