Tuesday, May 21, 2024
Homeनगरग्रामपंचायत बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले निवेदन

ग्रामपंचायत बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले निवेदन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यतील भामाठाण ग्रामपंचायत बंद करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी सगपंच व ग्रामसेवक यांना निवेदन दिले.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात गावठाण गट वाटप व त्यानंतर घरकुल लाभार्थीचे घरकुल काम होणार होते. परंतु त्याची प्रक्रिया बंद झाल्याने ग्रामस्थांनी 26 जानेवारी 2022 रोजी झालेल्या ग्रामसभेत गावठाण वाटपचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागत नाही, तोपर्यंत भामाठाण ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात यावे, असे निवेदन सरपंच व ग्रामसेवक यांना दिले आहे.गावठाण वाटपाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा, यासाठी सर्व ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या