Friday, May 3, 2024
Homeनगरगावकारभारी कोण? आज निकाल

गावकारभारी कोण? आज निकाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात 195 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज (मंगळवारी) होत आहे. रविवारी जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागात उत्साहाने मतदारांनी मतदानात सहभाग घेत लोकशाही साजरी केली आहे. दुसरीकडे 188 सरपंचांची आज थेट जनतेतून निवड होणार असून कोणाची भाग्य उजळत सरपंच पदाची माळ गळ्यात पडणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 203 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. उमेदवारी माघारीच्या दिवशी 13 ग्रामपंचायती आणि 15 सरपंच बिनविरोध झाले होते. त्यानंतर रविवार (दि.17) रोजी 188 सरपंच पद आणि 195 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. झालेल्या मतदानाची आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

श्रीरामपूरचा लवकर, संगमनेरचे संपूर्ण निकाल दुपारनंतर येणार

श्रीरामपूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींपैकी दोन बिनविरोध झाल्या. अन्य चार ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने खंडाळा वगळता अन्य छोट्या ग्रामपंचायती असल्याने संपूर्ण निकाल हाती येण्यास 11 वाजण्याची शक्यता आहे. तर संगमनेरात सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे मतमोजणीची आकडेवारी येण्यास दुपारचे दोन वाजणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या