Monday, May 27, 2024
Homeनगर11 ग्रामपंचायत पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर

11 ग्रामपंचायत पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी सरपंच-उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने पदे रिक्त झाले आहेत. अशा सर्वच्या सर्व 11 ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जाहीर केले आहे. यात 9 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि दोन उपसरपंच यांची निवड 17 जुलैला अथवा आदेश काढल्यानंतर 15 दिवसांत निवड होणार आहे.

- Advertisement -

गाव पातळीवरील राजकीय समीकरणानुसार सरपंच आणि उपसरपंचपदाचा कार्यकाळ वाटून घेतला जातो. आपसातील समझोत्यानुसार कार्यकाळ पूर्ण झाल्यावर राजीनामा देतात. जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि दोन उपसरपंचांनी राजीनामा दिला आहे. सुगाव खुर्द (अकोले), धानोरा (जामखेड), पळवे बुद्रुक, हिवरे कोरडा (पारनेर), हिंगणी दुमाला (श्रीगोंदे), रवळगाव (कर्जत), लखमापुरी (शेवगाव), देहरे आणि टाकळी काझी (ता.नगर) या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यची विशेष सभा होणार आहे.

सावरकुटे आणि तेरूंगण (ता.अकोले) या दोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निवडीसाठीचा आदेश संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना दिला आहे. येत्या 17 जुलै रोजी किंवा आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक घ्यायची आहे. या निवडणुकीअगोदर संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना किमान तीन दिवस अगोदर पदाधिकारी निवडीच्या विशेष सभेची नोटिस बजावण्याच्या या आदेशात नमूद केलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या