Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : ग्रामसेवकांना कामात मोठी संधी - भुसे

Video : ग्रामसेवकांना कामात मोठी संधी – भुसे

नाशिक । प्रतिनिधी Nashik3

ग्रामसेवक हे पद अत्यंत संवेदनशील असून, जिल्हा पातळीवर तो 155 योजना राबवत असतो. योजना राबवणे आव्हानात्मक असले तरी लोकसेवक म्हणून ही सगळ्यात मोठी संधी देखील आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी निर्धार केल्यास जिल्हासह राज्याचा देखील जलद गतीने कायापालट होऊ शकतो असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.दै.’देशदूत’ आयोजित ‘ग्रामसेवक पुरस्कार 2023’ हा सोहळा आज नाशिक पुणे रोड वरील हॉटेल नाशिक क्लबमध्ये पार पडला यावेळी भुसे बोलत होते.

- Advertisement -

यावेळी ग्रामपचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, ‘देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे संचालक विक्रम भाऊ सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, ग्रामीण व्यवस्थापक सचिन कापडणे उपस्थित होते. जिल्हाभरातील 19 ग्रामसेवकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी भुसे म्हणाले की, ग्रामीण भागात ग्रामसेवक हा जनता व प्रशासन यांच्यातील दुवा असतो. आधी जिल्ह्यात बर्‍याच गावांमध्ये या ग्रामसेवकाची बदली करा अशी ओरड असे. आता मात्र चांगले काम करणार्‍या ग्रामसेवकांची बदली करू नका असे गावकरी म्हणतात. ही ग्रामसेवकांच्या कामाची पावती आहे. अशा प्रकारच्या पुरस्कारांनी इतरांना देखील प्रेरणा मिळून त्यांच्या हातून देखील चांगले कार्य पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दैनिक ‘देशदूत’ व सारडा परिवाराचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले. तत्पूर्वी सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विक्रमभाऊ सारडा यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, ‘देशदूत’ हे अनेक चांगल्या चळवळींना पाठिंबा देणारे वृत्तपत्र आहे. गावाच्या विकासाच्या गंगेत ग्रामसेवक हा महत्त्वाचा दुवा आहे. वर्तमानपत्र देखील अशाच प्रकारचा दुवा आहे. त्याच कटिबद्धतेबद्दल आदर्शवत काम करण्यार्‍या ग्रामसेवकांचा हा गौरव सोहळा आहे. त्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी पुरस्कार सोहळा देशदूतने आयोजित केला असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा. सोनाली म्हरसाळे यांनी सूत्रसंचालन केले. देशदूतचे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी आभार मानले.

पाणी जपून वापरा; पालकमंत्र्यांचे आवाहन

चालू वर्षाला राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी होते. यामुळे पाणी जपून वापरावी लागेल. मध्यंतरी थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने चारा टंचाई अल्प प्रमाणात कमी झाली असली तरी त्याचे नियोजन करण्याचे आवाहन पालकमत्र्यांनी केले. पिण्याचे पाणी, चारा, लोकांच्या हाताला काम मिळणे, आरोग्य, शिक्षण, आणि मुख्यत्वेकरून जिल्हा परिषद शाळा यांकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचेही भुसे यांनी सांगितले.

यांचा झाला सन्मान

रविंद्र चौधरी, जांबुटके

नईम सैय्यद कोर्‍हाटे

गोरखनाथ आढाव, कसबे वणी

रमेश राख, ढंकाबे

दत्तात्रय गायकवाड, चौसाळे

हिरालाल पाटील, जऊळके दिडोरी

संजीव बागुल, चारोसा

किशोर खिल्लारी, उमराळे खुर्द

संजय पाटील, लखमापूर

संजय देशमुख, अहिवंतवाडी

किरण आहिरे, बेळगाव कुर्‍हे

भरत कदम, कुंभारी

जितेंद्र चाचरे, साकुर

लिंगराज जंगम, पिंपळगाव बसवंत

अमोल भामरे, कुर्हेगाव

शरद धामणी

मच्छिंद्र भनगीर, गोंदे व सरदवाडी

किशोर मराठे, हरसूल व मुसवड

शक्तीकुमार सोनवणे, बेरवळ

- Advertisment -

ताज्या बातम्या