Wednesday, January 7, 2026
HomeनगरNewasa : ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे नेवाशातून प्रस्थान

Newasa : ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे नेवाशातून प्रस्थान

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीने टाळ मृदुंगाच्या गजरात व ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी माऊली माऊलीच्या गजराने नेवासेनगरी दुमदुमली होती. या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी भाविक सहभागी झाले आहे. देविदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघाली असून आळंदीच्या धर्तीवर बनवलेला माऊलींचा पालखी रथ नेवासकरांचे आकर्षण ठरला होता. दिंडी प्रस्थानापूर्वी श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज व पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे वंशज मेघ:शाम गोसावी महाराज यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांचे अभिषेक घालून पूजन करण्यात आले.

- Advertisement -

गंगापूर येथील रामभाऊ महाराज राऊत, उद्धवजी महाराज मंडलिक, श्रीराम महाराज झिंजुर्डे, रमेशानंदगिरी महाराज, भगवान महाराज जंगले यांच्यासह आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विश्वास गडाख, अध्यक्ष पांडुरंग अभंग, पंचगंगाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, तहसिलदार संजय बिरादार, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, मुख्याधिकारी संतोष लांडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, रविराज गडाख यावेळी उपस्थित होते. उपस्थित महंतांच्या हस्ते पालखी रथात ठेवण्यात आलेल्या माऊलींच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.

YouTube video player

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून पालखी दिंडी नेवासा शहरात नगर परिक्रमेसाठी आली असता या दिंडीचे रामकृष्णनगर येथे नंदकिशोर महाराज खरात, आढाव महाराज, चक्रनारायण परीवार यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथे उद्धव महाराज मंडलिक, पी. आर. जाधव यांनी स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजीत हिंदुराजे तरुण मंडळाचे जालिंदर गवळी, सचिन पंडुरे, अक्षय टेकाळे, सागर पंडुरे, मनोज चक्रनारायण, भगवान शेंडे, बाळू डांगरे, राहुल कोरेकर, प्रकाश दाणे यांनी स्वागत केले. राजू घोरपडे, भाऊराव मतकर, शंकर बहिरट, महेश व्यवहारे यांच्या जेसीबीद्वारे दिंडी सोहळ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. लोखंडे गल्लीत भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे, सतिष गायके, कैलास बोरुडे यांनी स्वागत केले. श्री. संत ज्ञानेश्वर चौकात डॉ. भाऊसाहेब घुले, विजय कावरे, डॉ. करण घुले यांनी स्वागत केले.डॉ. हेडगेवार चौकात राजेंद्र काळे धनुभाऊ काळे, श्री मोहिनीराज मंदिर येथे देवस्थानचे भालचंद्र बडवे, शंकर बडवे, अनिल बडवे, स्वानंद बडवे व डॉ. शंकर शिंदे प्रशांत कानडे सतिष पिंपळे, अनिल शिंदे, श्रावण रेनिवाल संतोष कुंढारे, रुपेश उपाध्ये, विनोद नळकांडे पुढील चौकात कराळे परीवार, अंबिलवादे परीवार, रासने परीवार, मुथ्था परीवार, गुगळे परीवार यांनी स्वागत केले.

औदुंबर चौकात मुंडलीक परीवार परदेशी परीवार, नगरपंचायत चौकात शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप, सागर शिंदे, अक्षय दाणे, सचिन कदम, बिट्टू धनवटे, गणेश व्यवहारे, शुभम पवार, बाबा लिंबोरे, स्वप्नील मापारी, दीपक धोत्रे यांनी खोलेश्वर गणेश मंदीर येथे संदीप बेहळे यांनी स्वागत केले.दिंडी बसस्थानक येथे आली असता राकेश सोनवणे, काकासाहेब पोटे, विकास सातपुते यांनी स्वागत केले. चौकाचौकात सडासमार्जन करुन, रांगोळया घालून पंचारती ओवाळून सुवासिनींनी स्वागत केले तर भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करत तोफांची सलामी देत माऊलींच्या या दिंडीचे नेवासकर नागरिकांनी स्वागत केले. माऊली दिंडीच्या स्वागतासाठी नेवासा शहरातील प्रत्येक चौकामध्ये विविध संस्था संघटनाच्या वतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. दिंडीतील पहिला रिंगण सोहळा नेवासा एसटी स्टॅण्डच्या प्रांगणात झाला. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

रिंगण सोहळ्यानंतर सदरची पालखी दिंडी नेवासा मार्केट कमिटी मार्गे नेवासाफाटा रोडवर असलेल्या आराध्या मंगल कार्यालय येथे मुक्कामास गेली. यावेळी नेवासा खुर्द व नेवासा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आमटी-भाकरीची मानाची पहिली पंगत देण्यात आली. रात्री देविदास महाराज राऊत यांची कीर्तन सेवा भक्तिमय वातावरणात पार पडली. सदर दिंडीमध्ये सुमारे 15 हजार भाविक सहभागी झाले असून पंढरपूरच्या वाटेवर अनेक दिंड्या या दिंडीमध्ये सहभागी होणार असल्याने सुमारे तीस ते चाळीस हजार वारकर्‍यांची दिंडी पुढे जाऊन होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याकरिता असलेल्या माऊलीच्या पालखीचे अश्व व बैल जोडी यांची प्राथमिक आरोग्य तपासणी पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली तसेच औषध वाटप करण्यात आले. याप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल हरिभाऊ गायकवाड, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. तेजस घुले, फिरता पशुवैद्यकीय दवाखानाचे डॉ. काळे, डॉ. आवताडे, अशोकराव नागरगोजे, सुमित जायगुडे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...